Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Shivsena : शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेची त्रिसदस्यीय शिस्तभंग समिती

Eknath Shinde : विशेष काळजी घेतल्याचे कारण उदय सामंतांनी सांगितले

Maharashtra Politics : शिवसेनेची भविष्यात वाटचाल योग्यपणे होण्यासाठी तीन जणांची शिस्तभंग समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे अध्यक्ष दादा भुसे (Dada Bhuse) असतील. तर मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) आणि संजय मोरे हे सदस्य असतील.

त्याअंतर्गत पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई निश्चित केली जाईल. तसेच पक्षाच्या विरोधामध्ये काही लोकांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर शिस्तभंग होईल का, याची छाननी ही समिती करणार आहे. याबाबत माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर उदय सामंत (Uday Samant) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बाळासाहेबांच्या विचार पुढे घेऊत जात असताना शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याची आठवण करून दिली.

त्यानंतर बैठकीत आठ महिन्यातील कामांचा आढवा घेण्यात आला. तसेच निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नियमांचे आमदार, मंत्र्यांनी तंतोतंत पालन करण्याचे सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्याचे सामंत यांनी सांगितले.

Eknath Shinde
Shivsena : मोठी बातमी! शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड

शिवसेना (Shivsena) स्थापन केल्यानंतर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी सामाजिक कार्यातून आपला ठसा उमटविला. त्यामुळे शिवसेना राज्यात पोहचली. बाळासाहेबांनी कुणाशी युती करायची, कुणाशी नाही, याबाबत स्पष्ट भूमिका घेतली होती. त्याला स्मरून एकनाथ शिंदे यांनी उठाव केला. त्यास शिवसेनेचे ४० आमदार, १० अपक्ष आमदार, १३ खासदार यांनी समर्थन दिले. तो विचार जोपसण्यात कुणीही कमी पडता कामा नये, अशी भूमिका मुख्यंमंत्र्यांनी मांडली. त्यास सर्वांनी पाठिंबा दिल्याचेही सामंत यांनी सांगितले.

Eknath Shinde
Eknath Shinde : आघाडी, युतीच्या दिग्गज नेत्यांमुळे वाढली प्रचारातील शेवटच्या टप्यात रंगत

महाराष्ट्राच्या विकासाच्या जडणघडणीत पक्षाची वाटचाल कशी असावी, याबाबत चर्चा केल्याचे सामंत यांनी सांगितले. ते म्हणाले, "पश्चिम रेल्वे चर्चगेटला चिमणराव देशमुख, चिंतमणराव देशमुख यांचे नाव देणे, मराठी भाषेला (Marathi Language) अभिजात दर्जा मिळावा, त्यासाठी प्रयत्न करणे, राज्यातील तरूण स्पर्धा परीक्षांकडे वळविण्यासाठी ग्रामीण भागात प्रशिक्षण केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचा ठराव झाल्याचे सामंत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com