मनसे आमदार राजू पाटील यांचा टोला : सेना लढाईतही हरली...तहात पण हरली...

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली.
Raju Patil
Raju Patilsarkarnama

डोंबिवली - राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला असून भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. या निकालावरून मनसे आमदार राजू पाटील यांनी औरंग्याच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांसमोर त्यांच्या दोन मतांसाठी गुडघे टेकून काय मिळवले ? सेनाप्रमुखांच्या विचारांना दफन करून कट्टर सैनिकाचा बळी पण दिला. सेना लढाईतही हरली व तहात पण हरली असे ट्विट करत शिवसेनेला टोला लगावला आहे. ( Criticism of MNS MLA Raju Patil: Army lost in battle too ... but lost in battle ... )

राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. काही अपक्षासोबत मनसेच एकमेव मत हे भाजप गेल्याचे यावरून दिसून आले आहे. विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे मनसे आमदार यांनी ट्विटरवरून अभिनंदन केले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला ट्विटरवरून टोला सुद्धा हाणला आहे. मनसे आमदार यांनी सांगितले की शिवसेना लढाईतही हरली आणि तहात पण हरली आहे.

Raju Patil
"...तर मनसेचे मत शिवसेनेला गेले असते" : राजू पाटील यांचे मोठे विधान

राज्यसभा निवडणुकीसाठी ऐन वेळेला भाजपाने 3 उमेदवार जाहीर केल्यानंतर शिवसेना अपक्षांची मते मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती. समाजवादी पार्टीचे अबू आझमी व एमआयएम ने अप्रत्यक्ष रित्या शिवसेनेला पाठींबा दर्शविला होता.

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे असल्याने त्यांच्या मताला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले होते. त्यांचे मत कोणाला मिळणार की मनसे तटस्थ राहणार याविषयी अनेक चर्चा रंगल्या. त्यात भाजपचे आमदार आणि नेते आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यावर मनसेचे मत भाजपला असे जाहीर केल्यानंतर भाजपला मनसेचे मत जाणार यावर शिक्कामोर्तब झाले होते.

Raju Patil
शिवसेनेची सर्वात मोठी चूक ते राष्ट्रवादी बरोबर आहेत...

त्यावेळी आमदार राजू पाटील यांनी भाजपा आमदार शेलार हे राज साहेबांचे मित्र आहेत. त्यांनी विनंती केली की तुमचा पाठिंबा तुम्ही भाजपाला देणार का? राज ठाकरेंनी देखील त्यांना सकारात्मकता दाखवली आहे. त्यांनी विनंती केली त्यांना मान दिला. त्यांच्या विनंतीला पक्ष अध्यक्ष मान देतील. बाकी कोणी विनंती केलीच नसेल तर विषय येतोच कुठे ? मागील वेळेस छत्रपती संभाजी राजेंनी विनंती केली होती.त्यांच्या उमेदवारी अर्जावर मनसेने स्वाक्षरी केली होती.या विषयावर काही जणांनी इगो बाजूला सारून विचारलं असत तर पक्ष अध्यक्षांनी तोही विचार केला असता.परंतु ती लोक एमआयएम आणि अबू आझमी लोकांच्या मागे व्यस्त असल्याने त्यांनी विचार कदाचित केला नसेल. भाजपाच्या नेत्यांनी ते केलं असे सांगत इगो बाजूला ठेवून विचारलं असत तर अशा शब्दात सेनेची कानउघडणी केली होती. मात्र तरीही सेनेच्या नेत्यांनी मनसेला विचारात न घेतल्याने आज त्यांचा पराभव झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे राजू पाटील यांच्या ट्विटवरून दिसते.

Raju Patil
फडणवीस तेल लावलेले पैलवान असल्याची सर्वांना जाणिव झाली : 20 जूनला करेक्ट कार्यक्रम करणार

काय आहे ट्विट

औरंग्याच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांसमोर त्यांच्या दोन मतांसाठी गुडघे टेकून काय मिळवले ? सेनाप्रमुखांच्या विचारांना दफन करून कट्टर सैनिकाचा बळी पण दिला.सेना लढाईतही हरली व तहात पण हरली, असे ट्विटमध्ये म्हंटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in