शिवसेनेच्या चौदा खासदारांचं बंड? लोकसभेत स्वतंत्र गटाची मागणी करण्याची शक्यता

राष्ट्रपती पदाच्या एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची खासदारांची मागणी.
Eknath Shinde Latest Marathi News, Shiv Sena Latest Marathi News
Eknath Shinde Latest Marathi News, Shiv Sena Latest Marathi NewsSarkarnama

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी केलेल्या बंडानंतर आता खासदारही बंडाच्या तयारीत असल्याचे समजते. शिवसेनेच्या 19 पैकी 14 खासदारांकडून लोकसभेत स्वतंत्र गटाची मागणी केली जाऊ शकते. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. (Shiv Sena Latest Marathi News)

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे स्वतंत्र गटाची मागणी करण्यासाठी चौदा खासदार बंड करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त 'द हिंदू' या वृत्तसंस्थेने दिले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 13 किंवा 14 जुलै रोजी खासदारांकडून बिर्ला यांच्याकडे स्वतंत्र गटाची मागणी केली जाऊ शकते, असं वृत्तात म्हटलं आहे.

Eknath Shinde Latest Marathi News, Shiv Sena Latest Marathi News
शिंदे गट मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? कायदेतज्ज्ञांचा दावा...

एनडीएकडून राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने त्यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी दोन खासदारांनी केली आहे. त्यामध्ये राहुल शेवाळे आणि राजेंद्र गावित यांचा समावेश आहे. तसेच अन्य काही खासदारांनीही भाजपसोबत जाण्याची इच्छा उघडपणे व्यक्त केली आहे. त्यासाठीच 14 खासदार स्वतंत्र गटाची मागणी करण्याची शक्यता आहे.

चार खासदार ठाकरेंसोबतच राहणार

उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक अरविंद सावंत, विनायक राऊत, गजानन किर्तीकर आणि संजय मंडलिक हे चार खासदार शिवसेनेसोबतच राहणार आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त इतर खासदार शिंदे गटाच्या पाठिशी उभे राहू शकतात. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मुर्मू यांना पाठिंबा देण्यावर हे खासदार ठाम असल्याचे सांगितले जात आहे. नाराजीच्या कारणांपैकी हे एक कारण आहे.

Eknath Shinde Latest Marathi News, Shiv Sena Latest Marathi News
Eknath Shinde News : नरहरी झिरवाळांच्या उत्तरानं शिंदे सरकार अडचणीत येणार?

पक्षात उभी फूट पडण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. आमदारांपाठोपाठ खासदारही बाहेर पडतील. ठाणे आणि मुंबईतील नगरसेवकांनी शिंदे यांना समर्थन दिले आहे. आता पुणे आणि नंतर मुंबईतील आमदारही त्याचमार्गाने जातील, अशी अपेक्षा आहे, असं शिंदे गटातील सुत्रांनी सांगितल्याचे वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in