शिंदेंची ताकद वाढतच चाललीय; बारा खासदारही ठाकरेंची साथ सोडणार?

एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत 46 आमदार असल्याचा दावा केला आहे.
Eknath Shinde Latest Marathi News, Shiv Sena Latest Marathi News
Eknath Shinde Latest Marathi News, Shiv Sena Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची ताकद आता वाढू लागल्याचे चित्र आहे. आपल्याबाजूने 46 आमदार असल्याचा दावा त्यांनी केला असला तरी ही संख्या अजूनही वाढू शकते. तसेच आमदारांपाठोपाठ आता खासदारही शिंदेच्या गटात जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते. शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 12 खासदार शिंदे आणि समर्थक आमदारांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. (Eknath Shinde Latest Marathi News)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी जनतेशी संवाद साधत आपण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. बंडखोर आमदारांनी मुंबईत येऊन आपला राजीनामा राज्यपालांकडे घेऊन जावा, असं वक्तव्य ठाकरे यांनी केले आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनानंतरही काही मुंबईतील काही आमदार गुवाहाटीला जाणार असल्याचे समोर आले आहे. सदा सरवणकर, दिलीप लांडे यांच्यासह काही आमदार नॉट रिचेबल असल्याचे समजते.

Eknath Shinde Latest Marathi News, Shiv Sena Latest Marathi News
एकनाथ शिंदेंचा पहिला मास्टरस्ट्रोक; सुनील प्रभूंची मुख्य प्रतोदपदावरून उचलबांगडी

आमदारांच्या बंडखोरीची चर्चा असतानाच आता बारा खासदारही शिंदे यांच्यासोबत जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त 'एबीपी माझा'ने दिले आहे. शिवसेनेचे 18 खासदार असून बारा खासदार शिंदे यांच्यासोबत जाणार असतील तर हा ठाकरेंसाठी आणखी मोठा धक्का असेल. त्यामुळे आता ठाकरे पुढे काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, सुरतमध्ये मंगळवारी (ता. 21) सर्व बंडखोर आमदारांची बैठक घेऊन दोन महत्वाचे ठराव केले पारित केले आहेत. या ठरावाचे पत्र बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारार विधानसभा अध्यक्षांना प्राप्त झालं आहे. या पत्रावर चार अपक्ष आमदारांसह 34 आमदारांच्या सह्या असून पहिली सही गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची आहे. (Eknath Shinde Latest Marathi News)

Eknath Shinde Latest Marathi News, Shiv Sena Latest Marathi News
उद्धव ठाकरे पुन्हा 'वर्षा'ची पायरी चढणार नाहीत...

पक्ष नेतृत्वाने पक्षाच्या तत्वांशी तडजोड केल्या आमदार नाराज होते, अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. त्यामुळे ही बैठक घेऊन ठराव करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्रावर देसाई यांच्यासह महाराष्ट्रात परतलेले बाळापुरचे आमदार नितीन देशमुख यांचीही सही आहे. अपक्ष आमदारांमध्ये बच्चू कडू, राजकुमार पटेल, नरेंद्र भोंडेकर आणि राजेंद्र पाटील यड्रावरकर यांचा समावेश आहे.

या बैठकीत दोन बैठक ठराव करण्यात आले. एकनाथ शिंदे यांची 31 ऑक्टोबर 2019 रोजी विधीमंडळ गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. यापुढेही तेच गटनेते असतील, हा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर भरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्याचा आणि सुनिल प्रभू यांची हकालपट्टी करण्याचा ठरावही बैठकीत करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com