राणा दांपत्याला सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांसमोरच शिवसैनिकांचा इशारा

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या आव्हानाला जोरदार प्रत्युत्तर
CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeraysarkarnama

मुंबई : आवाज कोणाचा? शिवसेनेचा!, रवी राणाचं (Ravi Rana) करायचं काय, खाली डोकं वर पाय अशी घोषणा देत शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या `मातोश्री`चा परिसर दणाणून सोडला. आमदार रवी राणा यांना धडा शिकविल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यासमोरच या शिवसैनिकांना (Shiv sena workers at Matoshree) दिला.

मातोश्रीसमोर येऊन हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा राणा दांपत्याने दिला. त्याला शिवसेनेने जशास तसे उत्तर देण्याचे ठरवून शिवसैनिकांना `मातोश्री`बाहेर गर्दी केली होती. शिवसेना खासदार विनायक राऊत, माजी महापौर किशोरी पेडणेकर, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांना आज दिवसभर मातोश्रीसमोर ठिय्या मांडला.

CM Uddhav Thackeray
राणा दाम्पत्य मुंबईत दाखल; शिवसैनिकांच्या आक्रमकतेनं मातोश्रीबाहेरचं वातावरण तापलं

मुख्यमंत्री ठाकरे हे `वर्षा`या शासकीय निवासस्थानातून दुपारी `मातोश्री`वर परतले. त्यावेळीही शिवसैनिकांना त्यांनी नमस्कार केला. रात्री आठच्या सुमारास मुख्यमंत्री हे पुन्हा वर्षाकडे जाण्यास निघाले. तेव्हा त्यांनी शिवसैनिकांना घरी जाण्यास सांगितले. तुम्ही दिवसभर येथे थांबला आहात. आता आपापल्या घरी जा, असे आवाहन त्यांनी केले. मात्र त्यांचे आवाहन शिवसैनिकांनी मानले नाही. साहेब, आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. आम्ही राणांना धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका त्यांनी कायम ठेवली. वेळ पडली दुसऱ्या दिवशीही आम्ही `मातोश्री`बाहेर थांबू, अशा प्रतिक्रिया या वेळी शिवसैनिकांनी दिल्या.

राणा दांपत्याच्या घराबाहेर शिवसैनिकांकडून भजन

दुसरीकडे राणा दांपत्याने उद्या (शनिवारी) सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमानचालिसा पठन करणारच असा निर्धार पत्रकार परिषदेत बोलून दाखवला. यानंतर शिवसैनिक देखील आक्रमक झाले असून राणा दांपत्याला खार निवासस्थानी रोखणारच. मातोश्री जव्ळ पाऊल ठेवून देणार नाही असा पवित्रा घेत रात्रभर इथेच पहारा देण्यात येईल असे शिवसैनिकांकडून सांगण्यात आले आहे. आता शिवसैनिकांनी इथेच राणा दांपत्याच्या घराबाहेर टाळ मृदंग आणून भजन करण्यास सुरुवात केली.

CM Uddhav Thackeray
'मातोश्री'वर येऊन जा, महाप्रसाद घेऊन जा ; राणा दाम्पत्याला युवासेनेचं आव्हान

राणा काय म्हणाले?

आम्हाला पोलिसांनी नोटीस दिली, घरातून बाहेर पडू नका म्हणून सांगितले, अमरावतीत थांबवण्याचा प्रयत्न केला, पण जे आम्ही बोललो आहे, त्याप्रमाणे उद्या सकाळी 'मातोश्री'बाहेर जावून 'हनुमान चालिला' पठण करणारचं आहे. आता विरोध करणाऱ्या शिवसैनिकांच्यात दम आहे की, आमच्या हनुमान चालिसा पठण आणि नामस्मरणामध्ये हे बघू, असे आव्हान देत अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी शिवसेनेला ललकारले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com