नगरसेवक शिंदे गटात; शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते 'मातोश्री'वर

कल्याण, डोंबिवली, ग्रामीण भागातील शिवसैनिकांनी आपली एकजूट दाखवत 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama

डोंबिवली : कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali) मधील शिवसेनेच्या (ShivSena) बहुतांश नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेत त्यांना समर्थन दिले. यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. निष्ठावंत शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बाजूने असून त्यांना उभारी देण्यासाठी या शिवसैनिकांना 'मातोश्रीव'रुन आमंत्रण देण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी कल्याण, डोंबिवली, ग्रामीण भागातील शिवसैनिकांनी आपली एकजूट दाखवत 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.

डोंबिवली मधून शिवसैनिक लोकलने तर काही आपल्या वाहनाने 'मातोश्री'वर पोहचले. रेल्वेने गेलेल्या शिवसैनिकांनी भगवे झेंडे हातात घेतले होते. रेल्वे स्थानकात आणि लोकलमध्ये शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. डोंबिवली, कल्याण ग्रामीण भागातून 'मातोश्री'वर जाणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक होती.

Uddhav Thackeray
आमदार आशिष जयस्वालांना भाजपकडून फटाके लावणे सुरू ; त्यांचं मंत्रिपद दूर जातंय ?

शनिवारी 'मातोश्री'वर गेलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख आणि माजी आमदार सुभाष भोईर, भिवंडी ग्रामीणचे माजी आमदार रुपेश भोईर, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, सतीश मोडक, विवेक खामकर,अभिजत थरवळ, महिला आघाडी प्रमुख कविता गावंड, वैशाली दरेकर, अरविंद बिरमोळे, प्रकाश तेलगोटे, अभय घाडिगावकर, ममता घाडिगावकर, संजय मांजरेकर असे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Uddhav Thackeray
फडणवीस-तावडेंची कित्येक दिवसांनी गळाभेट; दिल्ली दौऱ्यात दोघांनीही जपला भावनिक बंध

दरम्यान, शिवसैनिक 'मातोश्री'वर पोहचल्याने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. सध्याच्या परिस्थितीत आपण ठाम राहून माझ्या पाठीशी ठाम राहिले आहात याबद्दल मला अभिमान आहे. यापुढील काळात कोणत्याही आणि कोणाच्याही दबावाला बळी पडू नका. एकजुटीने काम करा. पक्ष संघटना वाढवा आणि नवीन कार्यकारिणी तयार करून नव्या जोमाने कामाला लागा. येत्या पालिका निवडणुका आपणास ताकदीने लढवायच्या आहेत, असा सल्ला ठाकरे यांनी निष्ठावान शिवसैनिकांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in