शिवसेना शाखेचा वाद चिघळला; पोलिसांची ठाकरे गटाला नोटीस...

Shivsena : ठाकरे समर्थकांना शाखेतून बाहेर काढण्यात आले...
Shivsena , Dombiwali Latest News
Shivsena , Dombiwali Latest NewsSarkarnama

डोंबिवली : डोबिवली शिवसेना शाखेवर ताबा मिळविण्यासाठी शिंदे व ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु होते. दोन महिन्यांपूर्वी दोन्ही गटात तुफान राडेबाजीनंतर दिवाळी पार पडताच बाळासाहेबांची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना मध्यवर्ती शाखेवर गुरुवारी ताबा मिळविला.

करारनामा केला असल्याचे सांगत शिंदे गटाने शाखा ताब्यात घेतली आहे. शाखेचा वाद आता कागदपत्रांवर गेला असून पोलिसांनी ठाकरे गटाला नोटीस पाठवित त्यांच्याजवळील कागदपत्र सादर करण्यास सांगितले आहे. (Shivsena , Dombiwali Latest News)

Shivsena , Dombiwali Latest News
शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा कब्जा; करारनामा मात्र गुलदस्त्यात

शिवसेना कोणाची यावरुन शिंदे व ठाकरे गटातील वाद असून सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. शिवसेना आमची हा दावा शिंदे व ठाकरे गटाने केल्यानंतर शहरातील शाखा ताब्यात घेण्यावरुन वाद निर्माण झाले होते. त्यानंतर दोन्ही गटांत सामंजस्य होऊन डोंबिवलीतील शाखेचे दोन गटात विभाजन करण्यात आले. दिवाळी पर्यंत सारेकाही आलबेल असताना दिवाळी संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी सकाळी 9 च्या दरम्यान शिंदे गट समर्थकांनी डोंबिवली मध्यवर्ती शाखेवर ताबा घेतला.

Shivsena , Dombiwali Latest News
'राज्याला अजित पवार यांचासारखा मुख्यमंत्री हवा'

यावेळी आमचा वर्धमान कंपनीशी करार झाला असून कायदेशीर रित्या शाखेवर आता आमचा ताबा असल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात आले. यावेळी ठाकरे समर्थकांना शाखेतून चक्क बाहेर काढण्यात आले. रामनगर पोलिसांनी येथे कोणतीही वादाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. ठाकरे व शिंदे समर्थक काहीसे आपसात भिडल्यानंतर पोलिसांनी ठाकरे समर्थकांना पोलिस ठाण्यात घेऊन गेले होते. यानंतर आता पोलिसांनी ठाकरे समर्थकांना नोटीस पाठविली आहे.

Shivsena , Dombiwali Latest News
निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत नाराजीचा लेटरबॉम्ब : आमदार बनसोडेंना डावलले जात असल्याचा आरोप

डोंबिवली मध्यवर्ती शिवसेना शाखेच्या मालकी हक्कावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व बाळासाहेबांची शिवसेना असे दोन पक्षामध्ये वाद निर्माण झाले आहेत. दोन पक्षातील वादावरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यामुळे आपल्याकडे डोंबिवली शहर शिवसेना (Shivsena) मध्यवर्ती शाखेच्या जागे संदर्भात काही कागदपत्रे असल्यास, आपण सदरची कादगपत्रे चौकशी कामी तीन दिवसांत रामनगर पोलीस ठाणे येथे सादर करावीत, अशी नोटीस ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांना पाठविली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in