Shivsena
ShivsenaSarkarnama

शिवसेना हाय अलर्टवर : मतदानात चूक अथवा दगाफटका केल्यास आमदारांवर कडक कारवाई

राज्यसभा निवडणुकीत मतदानाची दाेन दिवस कार्यशाळा घेऊनही काहींची मते बाद झाल्याने पक्षनेतृत्वाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या (Legislative Council Election) पार्श्वभूमीवर शिवसेना (Shivsena) हाय अलर्टवर आली आहे. राज्यसभा निवडणुकीत दोन दिवस कार्यशाळा घेऊनही चुका आणि दगाफटका झाला होता. त्याची पुनरावृत्ती विधान परिषद निवडणुकीत होऊ नये, यासाठी शिवसेनेकडून पुरेपूर दक्षता घेतली जात आहे. ‘या वेळी जर कोणत्या आमदाराने मतदान करताना चूक केली तसेच, जर कोणत्या नेत्याने दगाफटका केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याकडून सांगण्यात आले. (Shiv Sena will take strict action against MLAs if they make a mistake while voting)

राज्यसभा निवडणुकीत पुरेशी काळजी घेऊन आणि हातात बहुमत असूनही शिवसेना उमेदवार संजय पवार यांना पराभूत व्हावे लागले होते. त्या निवडणुकीत झालेल्या चुका टाळण्यासाठी पक्षाकडून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदानाची दाेन दिवस कार्यशाळा घेऊनही काहींची मते बाद झाल्याने पक्षनेतृत्वाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, दगाफटका झाल्याने नेतृत्व आता सावध झाले आहे, त्यामुळे एखाद्या आमदाराने मतदान करताना चूक केली अथवा दगाफटका केला तर त्याच्यावर कडक कारवाईचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

Shivsena
दामाजी कारखाना निवडणूक : आमदार समाधान आवताडेंना काकाच देणार आव्हान?

विधान परिषद निवडणुकीत जर कोणत्या आमदाराने मतदान करताना चूक केली, तसेच कोणत्या नेत्याने दगाफटका केल्यास कडक कारवाई करणार असल्याचे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले. राज्यसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील आमदार सुहास कांदे यांनी जाणीवपूर्वक चूक केली की अनावधानाने झाली, याची शिवसेनेची समिती चौकशी करत आहे.

Shivsena
'सदाभाऊ, तुमच्या उधारीची पावती, राष्ट्रवादीच्या नावावर का फाडता?'

आमदार सुहास कांदे यांच्या एका मताचा शिवसेनेला फटका बसला आहे. तसेच, महाविकास आघाडीतील सर्व पक्षाच्या आमदारांची दोन दिवस सातत्याने कार्यशाळा घेऊन चूक झालीच कशी? असा प्रश्न नेतृत्वाला सतावत आहे. या संदर्भात पक्षांतर्गत चौकशी केली जात आहे.

Shivsena
पंचायतराज समितीच्या पाहुणचारासाठी 3 कोटी गोळा केले..? विक्रम काळेंनी कानावर हात ठेवले!

दरम्यान, राज्यातील काँग्रेसचे नेते आणि आमदारांची बैठक सायंकाळी पाच वाजता होणार आहे. ही बैठक विधान भावनाऐवजी हॉटेल फोर सिझनमध्ये होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com