सोमय्यांना रसद पुरविण्याचा आरोप असणारे कदम अडचणीत : शिवसेना नेतृत्व कारवाईच्या पवित्र्यात

शरद पवारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अनंत गीतेंना सबुरीचा सल्ला
सोमय्यांना रसद पुरविण्याचा आरोप असणारे कदम अडचणीत : शिवसेना नेतृत्व कारवाईच्या पवित्र्यात
Ramdas KadamSarkarnama

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या ॲाडिओ क्लिप प्रकरणावरून शिवसेनेत मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. या ॲाडिओ क्लिपमुळे पक्षाची बदनामी होत आहे, त्यामुळे रामदास कदम यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, महाआघाडीचे प्रमुख, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी मंत्री अनंत गीते यांनाही संयम पाळण्याचा सल्ला दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Shiv Sena will take action on Ramdas Kadam in audio clip case)

परिवहन मंत्री अनिल परब यांच्याबाबतच्या माहितीचा दारूगोळा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना रामदास कदम यांनी पुरविल्याचा आरोप होत आहे. त्यासंदर्भातील ॲाडिओ क्लिपही समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.

किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्याविरोधात मोहीमच उघडली आहे. त्यांचे रत्नागिरीतील रिसाॅर्ट, मुंबईतील म्हाडा इमारतीतील बांधकाम याबाबत सोमय्या यांनी सक्तवसुली संचनालयाकडे (ईडी) तक्रारी करत परब यांना घेरले आहे. ईडीनेही परब यांच्याविरोधात कारवाईही सुरू केली आहे. नुकतीच परब यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे आठ तास चौकशी केली आहे.

Ramdas Kadam
मोदी, शहांनी माझ्या पराभवाचा कट रचला

सोमय्या यांना याबाबतची कागदपत्रे ही कदम यांनी पुरविल्याचा आरोप होत असून त्यासंदर्भातील ॲाडिओ क्लिप व्हायरलही राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम आणि मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी समाज माध्यमांना दिल्या आहेत. त्यामुळे परबांच्या विरोधात लढण्यााठी सोमय्यांना शिवसेनेतील नाराज नेत्यांकडून दारुगोळी पुरविल्याची चर्चा सुरू आहे. मंत्रीपद न मिळाल्याने रामदास कदम हे नाराज असल्याचे बोलले जात आहे.

Ramdas Kadam
राष्ट्रवादीच्या उमेदवारांची घोषणा : अजित पवारांकडून सतीश काकडेंच्या मुलाला संधी !

या सर्व घटनांमुळे रामदास कदम यांच्याविषयी शिवसेनेत मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. त्यातूनच त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रामदास कदम यांच्यावर कारवाई केल्यामुळे पक्षात यापुढे असे कृत्य करणाऱ्या नेत्यांवर जरब बसेल, अशीही चर्चा पक्षाच्या व्यासपीठावर झाल्याचे सांगण्यात येत आहे. रामदास कदमांच्या ॲाडिओ क्लिपनं पक्ष बदनाम होत असल्याची नेत्यांची भावना आहे, त्यातूनच कदमांवर कारवाई करण्याचा विचार पुढे आल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री आणि रायगडचे माजी खासदार अनंत गीते यांनादेखील संयम पाळण्याचा सल्ला दिला जाणार आहे. कारण, त्यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यातून आघाडीत बेबनाव होऊ नये; म्हणून त्यांनाही सबुरीचा सल्ला देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

Related Stories

No stories found.