Budget Session : शिवसेनेने ठाकरे गटाच्या 15 आमदारांना बजावला व्हीप; न्यायालयीन संरक्षणाचं काय?

Bharat Gogawale : अधिवेशनाला पूर्ण वेळ हजर राहण्याबाबत आदेश!
Budget Session : BHarat Gogawale : Eknath Shinde :
Budget Session : BHarat Gogawale : Eknath Shinde : Sarkarnama

Bharat Gogawale : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) उद्या दि. २७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक व विधिमंडळातील शिवसेना पक्षाचे प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेना आमदारांसाठी व्हीप बजावला केला आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या आमदारांना देखील व्हिप बजावलेला आहे. यामुळे आता पुन्हा अधिवेशनात ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

शिवसेना प्रतोद भरत गोगावले म्हणाले, "शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप बजावण्यात आलेला आहे. शिवसेनेच्या आमदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला पूर्ण वेळ हजर राहायचे आहे, असा व्हिप बजावलेला आहे. शिवसेनेच्या सर्व ५५ आमदारांना व्हिप बजावण्यात आलेला आहे."

Budget Session : BHarat Gogawale : Eknath Shinde :
Rahul Gandhi : भारत मातेने संदेश दिला अन् ..; राहुल गांधींची प्रांजळ कबुली

सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे समर्थक आमदारांना व्हीपपासून संरक्षण दिलेले असताना, सर्व आमदारांना व्हीप कसा बजावण्यात आला? असा प्रश्न विचारल्यावर गोगावले म्हणाले, "आम्ही कोणावर ही कारवाई करणार नाही. परंतु अधिवेशनाला हजर राहण्याबाबत सांगणे ही कारवाई होत नाही. सर्व आमदारांनी अधिवेशनास पूर्ण वेळ हजर राहावं. यानंतर कळेल की, कोण हजर राहतं आणि कोण राहत नाही"

Budget Session : BHarat Gogawale : Eknath Shinde :
G-20 News : महिलांच्या आर्थिक सबलीकरणाची शिफारस करणार

दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनवाईमध्ये ठाकरे समर्थक आमदारांना शिवसेना पक्षाच्या व्हीपपासून संरक्षण मिळाले होते. गोगावले यांच्या व्हिपचं पालन न केल्यास, ठाकरे गटाच्या आमदारांवर कारवाई होणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com