'आम्ही सर्वजण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठीशी!'

राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) आणि काँग्रेसने (congress) शिवसेनेने राणा दाम्पत्याविरोधात उघडलेली आघाडी आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईला पाठिंबा दिला आहे.
'आम्ही सर्वजण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठीशी!'
Balasaheb Thorat, Uddhav Thackeray, Ajit Pawarsarkarnama

मुंबई : शिवसेना प्रमुखांच्या मातोश्री या निवास्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केलेला निर्धार यामुळे मुंबईत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरुन भाजप (BJP) आक्रमक झाली असली तरी महाविकास आघाडीने शिवसेनेला (Shivsena) जोरदार पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) आणि काँग्रेसने (congress) शिवसेनेने राणा दाम्पत्याविरोधात उघडलेली आघाडी आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईला पाठिंबा दिला आहे.

राणा दाम्पत्याच्या या कृत्यावर प्रतिक्रिया देताना, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले "तुम्हाला असे काही करायचे असेल, तर तुमच्या घरात, मंदिरात जाऊन करा. जाणीवपूर्वक तिथे काही ना काही वक्तव्य करून त्यातून नवीन प्रश्न निर्माण होणार आहेत. हे दिसत असताना अशी वक्तव्ये केली गेली. इतरांचे ऐकणे गरजेचे होते. तुम्हाला जे काही करायचे ते तुमच्या घरासमोर करा. तुमच्या घरात किंवा मंदिरात जाऊन करा, कुणालाच काही विरोध असायचे काही कारण नाही, असे अजित पवार म्हणाले.

Balasaheb Thorat, Uddhav Thackeray, Ajit Pawar
चंद्रकांतदादा... दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून सत्तेचे स्वप्नं किती वेळा बघणार?

अजित पवार यांनी रविवारी सकाळी माध्यमांशी बोलताना या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. ''कुणावरच हल्ला व्हायला नको. कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही, असेही ते म्हणाले. ज्यांचे स्वत: चे जात प्रमाणपत्र बोगस आहे, ते लोकांना धर्म शिकवत आहेत, असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्वीट करून लगावला.

तर, महागाई, बेरोजगारीवरून लक्ष विचलीत करण्यासाठी हनुमान चालीसाचा वाद उकरून काढल्याचा आरोप मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

केंद्रातील भाजपचे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत असताना पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, जीवनावश्यक वस्तूंची जीवघेणी महागाई, बेरोजगारी यासारख्या समस्यांनी जनता त्रस्त आहे. जनतेचे लक्ष या ज्वलंत मुद्यांवरून दुसरीकडे वळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवास स्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचे काम काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत, बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

नवनीत राणा व रवी राणा यांचे नाव न घेता बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, देशातील जनता महागाईने होरपळत आहे, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, शेतकरी, कामगार यांचे प्रश्न आहेत. केंद्र सरकार या प्रश्नावर अपयशी ठरलेले आहे, मुख्य मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी काही लोकांना पुढे करून भाजप राज्यातील वातावरण बिघडवण्याचे काम करत आहे.

Balasaheb Thorat, Uddhav Thackeray, Ajit Pawar
शिवसैनिक राणांची पाठ सोडेनात! घर, पोलिस स्टेशन, न्यायालय, कारागृह जिथे तिथे निदर्शन

राज्यात कायदा सुव्यवस्था उत्तम असून प्रशासन त्यांचे काम करत आहे. मात्र, काही लोक वातावरण गढूळ करण्याचे काम करत आहेत. हनुमान चालीसाला राजकीय मुद्दा बनवले आहे, त्या पाठीमागे भाजप असून काही चेहरे पुढे केले जात आहेत. महाविकास आघाडी सरकार विरोधकांचे मनसुबे ओळखून आहे, सरकार भक्कम आहे व आम्ही सर्वजण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाठीशी आहेत. तसेच राज्यातील जनता सुज्ञ असून अशा प्रकारच्या षडयंत्राला ते बळी पडणार नाहीत, असेही थोरात म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.