शिवसेना विरुद्ध शिंदे गटाची कायदेशीर लढाई चार-पाच वर्ष चालणार? गोगावलेंचा दावा

CM Eknath Shinde| Uddhav Thackeray| शिवसेनेचा धनुष्यबाण ही निशाणीदेखील शिंदे गटालाच मिळणार
Uddhav Thackeray News, CM Eknath Shinde News, Supreme Court News
Uddhav Thackeray News, CM Eknath Shinde News, Supreme Court NewsSarkarnama

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेला शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील कायदेशीर लढाई चार ते पाच वर्ष चालणार, ठाकरे- शिंदे गटाचा खटला मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. असे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यांनी केले आहे. इतकेच नव्हे तर शिवसेनेची (Shivsena) ओळख असलेला धनुष्यबाण ही निशाणीदेखील शिंदे गटालाच मिळणार, असा दावाही गोगावले (Bharat Gogawale) यांनी केला आहे. आता गोगावलेंच्या या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गोटातील चिंता वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

शिंदे गटाने आमचीच खरी शिवसेना असे म्हणत धनुष्यबाणावरही दावा केला होता. या प्रकरणी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झालेली नाही. ४ ऑगस्ट रोजी शेवटची सुनावणी झाली होती. त्यानंतर 'तारखांवर तारखा असाच प्रकार सुरु आहे. या सगळ्यामुळे शिवसेनेची चिंता अधिकच वाढत चालली आहे. त्यातच भरत गोगावलेंच्या वक्तव्याने त्यामध्ये आणखी भर पडणार आहे.

Uddhav Thackeray News, CM Eknath Shinde News, Supreme Court News
दसरा मेळावा कुणी हायजॅक करू शकत नाही; आदित्य ठाकरेंनी ठणकावून सांगितलं

रविवारी एका सभेत बोलताना भरत गोगावले यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीसाठी अनेकांनी देव पाण्यात बुडवले, शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील. आमचे सरकार कोसळेल, अशी अनेकजण आस लावून बसले आहेत. पण आता आपली तक्रार घटनापीठाकडे गेली आहे. आता या प्रकरणाला जवळपास चार-पाच वर्षे लागणार आहे. दुसरी निवडणूक जिंकून आपण पुन्हा सत्तेत येऊ, असे भाकितही भरत गोगावले यांनी यावेळी केले.

सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरत नाहीत तोपर्यंत शिंदे-फडणवीस सरकार हे सुरळीत चालू राहणार. शिंदे-फडणवीस सत्ता कायम राहिली तर भविष्यात शिवसेनेची आणखी पडझड होऊ शकते. त्यामुळे शिवसेनेकडून लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली जात आहे. मात्र या प्रकरणात अनेक घटनात्मक पेचही आहेत. हा गुंता सोडवण्यासाठी न्यायालयाकडून पाच सदस्यीय घटनापीठ नेमण्यात आले आहे. आता हे घटनापीठ कधी सुनावणी घेणार आणि काय निकाल देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातच आता दसरा मेळाव्यावरुनही शिवसेना विरुद्ध शिंदे गटाचा सामना रंगला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in