शिंदे सरकारचे चालले काय? भ्रष्ट अधिकारी पुन्हा सेवेत

सुशील खोडवेकर (Sushil Khodvekar) यांना पुन्हा सेवेत घेतल्यामुळे शिंदे सरकार अडचणीत येण्याची शक्याता आहे
Manisha Kayande, Eknath Shinde
Manisha Kayande, Eknath Shindesarkarnama

Manisha Kayande : मुंबई : महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकारने निलंबीत केलेल्या अधिकाऱ्यांना शिंदे सरकारने पुन्हा सेवेत घेतल्यामुळे शिवसेनेच्या (Shivsena) प्रवक्त मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी टीका केली आहे. त्याच बरोबर शिंदे सरकराने काढलेल्या शासन निर्णयावरही त्यांनी निशाणा साधला आहे.

मनीषा कायंदे म्हणाल्या, प्रचंड मोठ्या शक्तीच्या, महाशक्तीच्या आशीर्वादाने राज्यात दोन लोकांचे जंम्बो मंत्रिमंडळ अस्तित्वात आले. त्यानंतर सदर मंत्रिमंडळाने मंत्रीमंडळ बैठकीचे निकष डावलून आपल्या ड्रीम प्रोजेक्ट ला पूरक असणाऱ्या विभागातील विविध विषयांशी संबंधित शासन निर्णयांचा सपाटा लावला. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीमंडळ अस्तित्वात असताना घेतलेल्या 350 निर्णयांवर आक्षेप घेणार हे द्विसदस्यीय सरकार स्वतः मात्र, फक्त 30 दिवसांमध्ये 800 च्या आसपास शासन निर्णय काढून मोकळे झाले, अशी घणाघाती टिका त्यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारने दोषारोप ठेवून निलंबनाची कारवाई केली होती. त्या अधिकाऱ्यांना या सरकारने तात्काळ सेवेत घेण्याची घाई केलेली आहे. भ्रष्टचार, चारित्र्यहनन अशा आरोपामुळे निलंबित असलेल्या डझनभर IAS/IPS अधिकाऱ्यांना ED सरकारने सेवेत घेतले, असा टोला कायंदे यांनी लगावला आहे. एवढेच काय तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्याला अधिवेशनात घोषणा करून निलंबित केले. ज्यांच्या भ्रष्ट कथांनी पेपरच्या पेपर भरायचे, अशा रिटायर IAS अधिकाऱ्याला मुख्यमंत्र्यांचा मुख्यसंल्लागार नेमले असल्याचा आरोप त्यांनी केला.

मागील आठवड्यापासून चर्चेत असलेल्या TET घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असलेले व मागील सरकारने अटक करून निलंबित केलेले तत्कालीन शिक्षण विभागातील उपसचिव सुशील खोडवेकर यांना विद्यमान सरकारने सेवेत घेतले. तसेचे त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली. या मागचा हेतू काय? पण अशा दोषारोप ठेवलेल्या अधिकाऱ्यांमुळे शासनातील स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होतो आहे. यामध्ये विविध घोटाळ्यांमध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना या सरकारने उच्च पदावर स्थान दिल्याचे जाणवते, असेही कायंदे म्हणाल्या आहेत.

आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, कृपया महाराष्ट्रातील योग्य, अभ्यासू, पात्र अधिकाऱ्यांची जबाबदार पदावर नियुक्ती करून राज्याच्या प्रगतीचा आलेख वृद्धिंगत करावा. तसेच ज्या अधिकाऱ्यांवर दोषारोप आहेत त्यांना सेवेत घेण्याची घाई करू नये. काही निकड अधिकारी असल्यास त्यांना कार्यकारी पदावर न ठेवता अन्यत्र नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणीही कायंदे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com