Shiv Sena : फोडा-झोडा-मजा पहा, कमळाबाईचे हेच तर मिशन होते; शिवसेनेचा हल्लाबोल

Shiv Sena : शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे बेइमानांचा, ‘सुरती’ बाजारबुणग्यांचा मेळा नसतो.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी रात्री ते मुंबईत दाखल झालेत. आज ते भाजप कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (shiv sena)'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपचे मिशन मुंबई (mumbai mission), शिंदे ग टाचा दसरा मेळावा (dasara melava) यावर अग्रलेखातून टीका केली आहे.

'शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत. मग फोडा-झोडा-मजा पहा. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जात आहे. शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजप आज आनंदाने नाचत आहे, पण ते स्वप्नरंजनात दंग आहेत', अशा शब्दांत शिवसेनेने भाजपावर टीका केली आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Supriya Sule : बारामती पाहण्यासाठी मी त्यांना स्वतः घेऊन जाईन ; सुळेंचा भाजप नेत्यांना चिमटा

"मराठी माणूस आपसात लढवला जात आहे. कमळाबाईचे हेच तर मिशन होते. ज्यांचे पक्ष कमिशनखोरीच्या मलिद्यावर तरारले आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार ? पण हे राज्य शिवरायांचे आहे. येथे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानी मर्द मावळे घडवले , ते मेल्या आईचे दूध प्यायलेले नाहीत याचे भान राखा ! बाकी सारे शिवतीर्थावरच !," असा सूचक इशारा शिवसेनेने दिले आहे.

सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे..

  • दसरा मेळाव्यातून फुंकलेल्या रणशिंगातून ‘कमळाबाई’च्याही वैभवात भर पडली आहे. याच दसरा मेळाव्यात अनेकदा भाजपचे ज्येष्ठ-श्रेष्ठ नेतेही अवतीर्ण झाले आहेत. दसरा मेळावा हा राजकीय जागर असतो. महाराष्ट्राची जनता जागती आहे हे देशाला दाखविणारा एक सोहळा असतो.

  • दसरा मेळावा म्हणे आता कोण कुठला बाटग्यांचा शिंदे गट घेणार. म्हणून शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही? अशी चर्चा सुरू झाली आहे.

  • शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे बेइमानांचा, ‘सुरती’ बाजारबुणग्यांचा मेळा नसतो. तो असतो अस्सल ज्वलंत मरहाठी – हिंदुत्व अभिमान्यांचा उसळता जनसागर.

  • दसरा मेळाव्याचे शिवतीर्थाशी एक नाते आहे. हे नाते तोडणाऱ्यांच्या 56 पिढय़ा खाली उतरल्या तरी त्यांना ते शक्य होणार नाही.

  • सर्वोच्च न्यायालय आम्ही मॅनेज केले अशी भाषा करणारे एक वेळ भाड्याची गर्दी जमवून स्वतःचा जयजयकार करतीलही, पण असे हवेतले बुडबुडे येतात आणि फुटतात. इतिहासात असे अनेक तोतये निर्माण झाले व गांडुळांप्रमाणे नष्ट झाले.

  • न्याय विकत घ्याल, पण जनमताचा उसळता सागर, जो शिवतीर्थावर लोटत असतो तो सागर कसा विकत घेणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in