शिवसेना फलकावरून बंडखोर शेवाळेंचे नाव हटवले; शाखाप्रमुखांना हल्ल्याची धमकी

शाखाप्रमुख किसन टिकेकर यांना फलकावरून नाव व फोटो काढल्याचा शेवाळे समर्थकांकडून जाब विचारण्यात आला.
Rahul Shewale
Rahul ShewaleSarkarnama

मुंबई : मुंबईतील मानखुर्द येथील शिवसेना (shivsena) शाखेच्या नामफलकावरून बंडखोर खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांचे नाव हटविण्यात आले आहे. त्यानंतर शेवाळे समर्थकांनी त्याचा जाब मानखुर्दचे शाखाप्रमुख किसन टिकेकर यांना विचारला. त्या प्रकारानंतर टिकेकर यांच्यावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली. टिकेकर यांनी या प्रकरणी मानखुर्द पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव कोळी यांनी दिली. (Shiv Sena Shakhapramukh in Mankhurd threatened with attack)

खासदार राहुल शेवाळे हे शिवसेनेतून बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत, त्यामुळे शिवसेना पक्षाच्या फलकांवरून त्यांची छायाचित्रे तसेच उल्लेख काढून टाकण्याचे आदेश शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आले आहेत, त्यानुसार मानखुर्द स्थानकलगतच्या शाखेबाहेर लावलेल्या फलकावरून खासदार शेवाळे यांचा फोटो काढण्यात आला आहे.

Rahul Shewale
बबनदादांचे ‘नो कॉमेंट्‌स’, तर रणजितसिंह म्हणतात ‘ प्रवेशाबाबत योग्य वेळी सांगू’

शाखाप्रमुख किसन टिकेकर यांना फलकावरून नाव व फोटो काढल्याचा शेवाळे समर्थकांकडून जाब विचारण्यात आला. तेव्हा वरिष्ठांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याचे शाखाप्रमुख टिकेकरांनी त्यांना सांगितले. त्यानंतर तुमच्यावर प्राणघातक हल्ला होणार असल्याची धमकीवजा माहिती एका अज्ञात व्यक्तीने टिकेकर यांनी दिली आहे.

Rahul Shewale
बबनदादांनी जयंत पाटलांना फोन केला... पण `ऑपरेशन लोटस`ची चर्चा जोरात

मानखुर्द शिवसेनेचे शाखाप्रमुख किसन टिकेकर यांनी याबाबत मानखुर्द पोलिसांना पत्र देत माहिती दिली आहे. तसेच, सुरक्षेचीही मागणी केली आहे. मानखुर्द पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महादेव कोळी यांनी या प्रकरणी दुजोरा देत चौकशी सुरू असल्याचे सांगितले. यासंदर्भात खासदार राहुल शेवाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in