शिवसेना म्हणते, 'फडणवीसांना २०२४ बरोबरच त्यांना २०२९ चीही तयारी करावी लागेल'

Shivsena| Devendra Fadanvis| Kirit Somaiya| समझनेवाले को इशारा काफी है!
Devendra Fadanvis -Sanjay Raut- CM Uddhav Thackeray, Shivsena-bjp politics, Shivsena on Devendra Fadanvis
Devendra Fadanvis -Sanjay Raut- CM Uddhav Thackeray, Shivsena-bjp politics, Shivsena on Devendra FadanvisSarkarnama

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी रविवारी शिर्डीत साई बाबांचे दर्शन घेतले. या देवदर्शनावरुन शिवसेनेने फडणवीसांचा समाचार घेतला आहे. यासोबतच रविवारी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टवर हातोडा मारण्यासाठी प्रतिकात्मक हातोडा सोबत नेला होता त्यावरूनही शिवसेनेने (Shivsena) दैनिक सामनाच्या अग्रलेखातून हल्लाबोस केला आहे. (Shivsena on Devendra Fadanvis)

राजकारण जाईल चुलीत, महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे असे शहाणपणाचे उद्गार फडणवीस यांनी साईचरणी काढले, पण महाराष्ट्राची इज्जत व गव्हर्नन्स चुलीत घालण्याचे काम ते स्वतःच करीत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे देवाच्या चरणी जाऊन बोलता हा महाराष्ट्रद्वेष म्हणजेच तुमचा गुड गव्हर्नन्स मानायचा काय? देवाच्या चरणी तरी खरे बोला!, असे म्हणत शिवसेनेने निशाणा साधला आहे.

Devendra Fadanvis -Sanjay Raut- CM Uddhav Thackeray, Shivsena-bjp politics, Shivsena on Devendra Fadanvis
मुख्यमंत्री ठाकरेंवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकाला शिवसैनिकांकडून चोप

दापोलीत परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट आहे की नाही, ते कायदेशीर की बेकायदेशीर ते ठरवायला न्यायालय व शासकीय यंत्रणा आहेत, पण मुंबईतून भाडोत्री लोक घेऊन कोकणातील शांतता भंग करायला पोहोचले. काय तर म्हणे, दापोलीतील अनधिकृत रिसॉर्ट तोडणार आहोत. मग भारतीय जनता पक्षाच्या असंख्य भ्रष्टाचारांबाबत हाच हातोडा शांत का? नारायण राण्यांपासून इतर अनेक नेत्यांनी मुंबईसह महाराष्ट्रात अनधिकृत इमले उभारून कायदे धाब्यावर बसवले आहेत. मारताय त्यावर तुमचे नौटंकी छाप हातोडे? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. तसेच, २०२४ बरोबरच त्यांना २०२९ चीही तयारी करावी लागेल. समझनेवाले को इशारा काफी है!,” असा सणसणीत टोला शिवसेनेने लगावला आहे.

उत्तर प्रदेशात नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल पन्नासेक मंत्र्यांचा शपथविधी करून घेतला. त्यातील 22 मंत्र्यांवर भयंकर गुन्हेगारी स्वरूपाची प्रकरणे नोंदवली आहेत व त्या मंत्र्यांना किमान पाच ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. गोव्यातही वेगळी स्थिती नाहीच. हे असले गुड गव्हर्नन्स तुम्हाला चालत असेल तर तो तुमचा प्रश्न. श्री. फडणवीस यांनी 2024 ची तयारी चालवली आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा, पण तोपर्यंत महाराष्ट्राची प्रतिमा देशात पुरती मलिन करायची, महाराष्ट्राच्या प्रशासनाचा पायाच पोखरून टाकायचा. प्रशासनावर चिखलफेक करून, खोटे आरोप करून प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची करायचे, हे कसले धोरण? हे असले राजकारण महाराष्ट्रात कधीच घडले नव्हते. असेही शिवसेनेने म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in