अखेर सामंत, देसाईंना आली जाग; 'सरकारनामा'च्या बातमीनंतर ट्विटरवर केला बदल

ठाकरे सरकार कोसळल्यानंतरही या नेत्यांनी ट्विटरवर मंत्रिपदाचा उल्लेख कायम ठेवला होता.
Uday Samant Latest News, Shambhuraj Desai
Uday Samant Latest News, Shambhuraj DesaiSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ठाकरे सरकारमधील आठ मंत्र्यांनी बंड केलं. त्यांच्यासोबत शिवसेनेतील 33 तर इतर नऊ आमदार होते. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर शिंदेंनी शपथ घेतली. त्याला आता पंधरा दिवस उलटून गेले आहेत. पण त्यानंतरही शिंदे गटात गेलेल्या चार माजी मंत्र्यांना मंत्रिपद सोडवत नव्हतं. त्यांच्या ट्विटरवर मंत्री असल्याचा उल्लेख असल्याचे वृत्त 'सरकारनामा'ने दिल्यानंतर दोघांना जाग आली आहे. (Maharashtra Politics Latest News)

शिंदे यांच्यासह ठाकरे सरकारमधील चार कॅबिनेट मंत्री आणि चार राज्यमंत्र्यांनी बंड केलं. हे सरकार कोसळल्यानंतर बहुतेक सर्वच मंत्र्यांनी आपल्या ट्विटरवरील मंत्रिपदाचा उल्लेख काढून टाकला. काहींनी माजी मंत्री असा उल्लेख ठेवला तर काहींनी आमदार किंवा पक्षातील एखादंं पद असल्याचा त्याचा उल्लेख ठेवला.

Uday Samant Latest News, Shambhuraj Desai
Maharashtra Politics : उदय सामंत, भुसे, देसाई अन् भूमरे यांना अजूनही मंत्रिपद सोडवेना!

पण शिंदे गटात गेलेल्या चार मंत्र्यांना मंत्रिपदाचा मोह काही सुटत नव्हता. याबाबत 'सरकारनामा'ने 15 जुलै रोजी 'उदय सामंत, भुसे, देसाई अन् भूमरे यांना अजूनही मंत्रिपद सोडवेना!,' असं वृत्त दिलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सामंत आणि देसाई यांनी हा उल्लेख बदलला आहे.

सामंत यांनी ट्विटरवर माजी मंत्री असा उल्लेख ठेवला असून देसाई यांनी तर माजी मंत्री हाही उल्लेख केलेला नाही. त्यांनी उत्कृष्ट संसदपटू आणि पाटण आमदार एवढाच उल्लेख ठेवला आहे. दादा भुसे आणि संदीपान भूमरे यांनी मात्र अद्यापही मंत्रिपदाचा उल्लेख कायम ठेवला आहे.

दादा भुसे (Dadaji Bhuse) यांच्या ट्विटर हँडलवर अजूनही ते कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री असा उल्लेख आहे. संदीपान भूमरे (Sandipan Bhumre) रोजगार हमी योजना मंत्री होते. त्यांनीही ट्विटरवरून पदाचा उल्लेख काढलेला नाही. तर उदय सामंत (Uday Samant) हे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री म्हणून मिरवत होते.

Shiv Sena MLAS Twitter
Shiv Sena MLAS Twitter

ठाकरे सरकारमध्ये शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) गृह राज्यमंत्री (ग्रामीण) होते. तसेच त्यांच्याकडे अर्थ, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क या खात्यांचाही कारभार होता. वाशिम जिल्ह्याचे ते पालकमंत्रीही होते. या सर्व पदांचा उल्लेख त्यांनी काढून टाकला आहे.

Shiv Sena MLAS Twitter
Shiv Sena MLAS Twitter

अजून ट्विटरवर मंत्री असलेले माजी मंत्रीे -

दादा भुसे - कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री

संदीपान भूमरे - रोजगार हमी योजना मंत्री

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com