बंडखोर आमदार मुंबईकडे रवाना : भाजप आणि शिंदे गटाचे उद्या होणार मिलन!

शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांची उद्या (ता. ३ जुलै) सकाळी भाजपच्या काही नेत्यांसोबत बैठक होणार आहे.
Eknath Shinde &Rebel  MLA
Eknath Shinde &Rebel MLASarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) गटाचे आमदार गोव्याहून (Goa) मुंबईसाठी (Mumbai) रवाना झाले आहेत. ते आज संध्याकाळी सातपर्यंत मुंबईत येणार असून त्यांच्या निवासाची सोय मुंबईतील ताज प्रेसिडेन्सी हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांची उद्या (ता. ३ जुलै) सकाळी भाजपच्या (bjp) काही नेत्यांसोबत बैठक होणार आहे. (Shiv Sena rebel MLA leaves for Mumbai)

शिवसेनेचे बंडखोर आमदार तब्बल बारा दिवसानंतर राज्यात परत येत आहेत. ते आज दुपारी साडेचारनंतर गोव्यात मुंबईसाठी रवाना झाले आहेत. ते आज सायंकाळी साडेसातपर्यंत मुंबईत पोचतील, असे सांगितले जात आहे. दुसरीकडे, बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून असणार आहेत. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने बहुमत चाचणीसाठी सोमवारपासून दोन दिवसांचे अधिवेशन बोलावले आहे. त्यामुळे सर्व आमदारांना मुंबईत येणे गरजेचे आहे, त्यानुसार बंडखोर आमदार गोव्याहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. भाजपचे बहुतांश आमदार मुंबईतच आहेत.

Eknath Shinde &Rebel  MLA
ठाकरेंनी दिलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरबाबत शिंदे म्हणाले, ‘मी त्याबाबत...’

दरम्यान, गोव्यातील बंडखोर आमदार आज मुंबईत येणार आहेत. सायंकाळी सातच्या सुमारास बंडखोर आमदार विमानतळावर दाखल होणार आहेत. ते मुंबईत दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक ताज प्रेसिडन्सी हॉटेलमध्ये होणार आहे. या बैठकीत कॅबिनेट व राज्य मंत्रीपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Eknath Shinde &Rebel  MLA
उद्धव ठाकरे आजही तुमचे नेते आहेत का..? एकनाथ शिंदेंनी दिले हे उत्तर...

दुसरीकडे, भाजपच्या काही नेत्यांसोबत या बंडखोर आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत विधानसभा अध्यक्ष निवड, बहुमत चाचणी याबाबतची माहिती संबंधित आमदार दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच, हे सर्व आमदार एकत्रितपणे विधानभवनात जाणार आहेत. विशेषतः शिवसेनेकडून बंडखोरांबाबत आक्रमक पवित्रा घेण्यात आलेला आहे. तसेच, शिवसेना नेत्यांकडून प्रक्षोभक भाषा वापरली जात आहे, त्यामुळे पोलिस यंत्रणेकडूनही विशेष दक्षता घेतली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com