संघटनेला फायदा नसलेले खासदार बारणे गेल्याने शिवसेनेचे नुकसान होणार नाही !

उद्धव ठाकरे यांनी बारणेंना दोनवेळा खासदार म्हणून संधी दिली. त्यांना पक्षाने काय कमी केले होते, याचे त्यांनी आत्मपरिक्षण करावं.
Sachin Bhosale, Shrirang Barne
Sachin Bhosale, Shrirang Barnesarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे प्रतिनिधीत्व करणारे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे पक्षाचे बंडखोर एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यावर शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक अॅड. सचिन भोसले यांनी काल (ता.१९) सडकून टीका केली.संघटनेला कसलाही फायदा नसलेले खासदार बारणे गेल्याने शिवसेनेचे कसलेही नुकसान होणार नाही, असा दावा त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केला. (shivesena latest news)

"शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बारणेंना दोनवेळा खासदार म्हणून संधी दिली. त्यांना पक्षाने काय कमी केले होते, याचे त्यांनी आत्मपरिक्षण करावं," असे शरसंधान अॅड. भोसलेंनी बारणेंच्या शिंदे गटात सामील होण्यावर केले. त्यांच्या जाण्याने शिवसेनेचे कसलेही नुकसान होणार नाही, पक्षावर विपरित परिणाम होणार नाही. कारण त्यांचा संघटनेला काहीच फायदा होत नव्हता,असा टोलाही त्यांनी लगावला.

अॅड. भोसले यांचा प्रभाग हा बारणेंच्या पिंपरी-चिंचवडमधील निवासस्थाजवळच आहे.तो बारणेंच्या मावळ मतदारसंघातील शहराच्या चिंचवड या विधानसभा मतदारसंघात मोडतो. बारणे शिंदे गटात गेले ,त्यावर तुमची भुमिका काय असे विचारले असता शहरप्रमुख भोसले यांनी कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली. बारणेंवर त्यांनी सडकून टीका केली. शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मानणारे असल्याने ते सर्व त्यांच्यासोबतच राहणार असल्याचा दावा त्यांनी केला.

Sachin Bhosale, Shrirang Barne
भाजपने युती तोडली तेव्हा हे कुठे होते ? राऊतांचा बारा खासदारांवर घणाघात

शहरातील खासदार (बारणे) गेले, तरी त्याचा शहर शिवसेनेवर कसलाही विपरित परिणाम होणार नाही, असे ते म्हणाले. दरम्यान,शहरातील शिवसैनिक ठाम असून सध्याचे पक्षातील गढूळ वातावरण महिन्यात निवळेल, असा दावा युवासेनेचे पुणे जिल्हा माजी समन्वयक जितेंद्र ननावरे यांनी केला आहे. तूर्त आम्ही सर्व वेट अॅन्ड वॉचच्या भुमिकेत आहोत,असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in