शिंदे गटाकडून शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता मनसे टार्गेट...

MNS| Shinde Group| आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मनसे, भाजप आणि शिंदे गटाच्या युतीची चर्चा रंगली आहे
MNS| Shinde Group|
MNS| Shinde Group|

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मनसे, भाजप आणि शिंदे गटाच्या युतीची चर्चा रंगली आहे. भाजप नेत्यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी वाढत्या भेटीगाठींनाही अलीकडे ऊत आला आहे. असे असतानाच आता शिंदे गट मनसेच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मनसे (MNS) सरचिटणीस संजय नाईक यांनी केला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राज ठाकरे, अमित ठाकरे यांचे दौरेही सुरु झाले आहे. गेल्या आठवड्यातच विदर्भ दौऱ्यावर असताना राज ठाकरे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. इतकेच नव्हे तर शिंदे गटासोबतही राज ठाकरेंची जवळीक वाढल्याचे दिसत आहे. पण संजय नाईक यांच्या आरोपांमुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे.

MNS| Shinde Group|
पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही.

शिंदे गटाकडून मनसे पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न सुरु असून त्यांना वेगवेगळी आमिषे आणि पदांची लालूच दाखवली जात आहे. शिंदे गट मनसे पदाधिकांऱ्यासोबत बैठका घेत असल्याचा आरोप संजय नाईक यांनी केला आहे. भायखळ्यात शिंदे गटाचे लोक मनसे पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना आमिषे देत आहेत. वेगवेगळी पदांची लालूच देत आहेत. शिंदे गटासमोर आधीच समोर एक शत्रू असताना ते आणखी शत्रू का निर्माण करत आहे, असा सवाल संजय नाईक यांनी उपस्थित केला आहे.

तुमचा गट मोठा करण्यासाठी दुसऱ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना फोडून काय साध्य करू इच्छिता ? मनसे-शिंदे गट एकत्र येणार नाही. मनसेने निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. तसेच, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्र लिहून विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गटातील नेत्यांना समज द्यायला हवी. आधीच एक शत्रु असताना शिंदे गटाने आणखी शत्रू निर्माण करून स्वत: च्या पायावर धोंडा मारून घेऊ नये, असा सल्लाही नाईक यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com