Sanjay Raut Live : सोमय्या बापबेटे तुरुंगात जाणार

संजय राऊत यांची पत्रकार परिषद पुन्हा नवीन राजकीय स्फोट घडविणार
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

पुढच्या साऱ्या प्रश्नांची उत्तर मुंबई पोलिस देतील. तक्रारदार उत्तरे देणार नाहीत. कोणाला बोलविणार, कधी बोलविणार, हे सांगायला आम्ही भाजपचे लोक नाहीत. 

ज्या प्रकारे केंद्रीय संस्थांना अधिकार आहेत, तसेच अधिकार मुंबई पोलिसांना आहेत. हे तुम्हाला लवकरच कळेल. 

अरविंद भोसले यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. 

भाजपच्या नेत्यांचीही नावे पुढील पत्रकार परिषदेत जाहीर करणार. हे महाविकास आघाडी सरकार टिकणार. मुंबई महापालिकेची निवडणूक समोर ठेवून तुम्ही आमच्यावर अशा छोट्या कारवाया करणार असाल तर ते बूमरॅंग होईल. तुम्ही मुंबईमध्ये कशा प्रकार खंडणीचे रॅकेट चालविले.

पुढच्या पत्रकार परिषदेत ईडीच्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर घेणार

माझे शब्द लिहून ठेवा : किरीट सोमय्या आणि नील सोमय्या हे बाप-बेटे तुरूंगात जाणार 

2012 ते 2016 पर्यंत किरीट सोमय्या यांनी DHFL आणि GVK जमीन घोटाळ्या बाबत MMRDA कडे तक्रार करत होते. तर सोमय्या यांचा DHFL च्या वाधवानसोबत नील किरीट सोमय्या भागीदार कसे काय?

महात्मा किरीट सोमय्या हे आमच्याविरोधात कागद फडकवतात. ती पीएमसी बॅंक घोटाळा, डीएचएफल याच्याबद्दल ते आम्हाला प्रश्न विचारतात. पण डीचएफएलच्या वाधवान सोबत सोमय्या यांचे काय संबंध आहेत, हे मी विचारले होते. 

ईडीचा सारा पैसा विदेशात चालला आहे. यात वसुलीत भाजपचे नेते देखील सहभागी आहेत. याची सारी माहिती मी देणार आहे. त्याची अधिकृत तक्रार मी दाखल केली आहे. मी हे सारे कागदावर बोलतो आहे. आता आमच्या महाराष्ट्र पोलिसांकडे याची कागदपत्रे दिली आहेत. 

जितेंद्र नवलानी आणि ईडीच्या चार अधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीबद्दल मुंबई पोलिसांकडे फिर्याद दाखल. मुंबई पोलिस याची चौकशी सुरू करत आहेत. ईडीचे काही अधिकारी तुरुंगात जाणार. माझे शब्द लिहून ठेवा. 

हे मोठे रॅकेट मुंबई आणि दिल्लीत बसून चालले आहे. मी आता जे सांगितले आहे ते फक्त दहा टक्के आहे. याबाबत दक्षता विभागाचा रिपोर्ट देखील आला आहे. हा रिपोर्टदेखील पंतप्रधानांना माहिती आहे. 

जीतेंद्र नवलानी यांच्या कंपन्यांना कोट्यवधी रुपये कसे दिले जातात... नवलानी आणि सोमय्या यांचा काय संबंध आहे हे मी लवकर सांगेल

ईडीची चौकशी सुरू होताच अविनाश भोसलेंकडून ईडीचा एजंच नवलानीच्या अकौंटवर पैसे जमा.

DHFL घोटाळ्यात नवलानी याचा संबंध. या कंपनीकडून नवलानी याच्या अकौंटवर 25 कोटीकडून खात्यावर जमा, वाधनवान कडून दहा कोटी आणि अविनाश भोसलेंच्या कंपन्याकडून सात कोटी रुपये जमा झाला. 

जितेंद्र चंद्रलाल नवलानी हा ईडीचा एजंट असल्याचा राऊत यांचा गौप्यस्फोट. याच्या 7 कंपन्या असून खंडणी वसूल केली गेली आहे. खंडणी वसूल केलेले पैसे हे नवलानी च्या कंपन्यांमध्ये टाकण्यात आलेत.

ईडीच्या अधिकाऱ्याने उत्तर प्रदेशमधील भाजपच्या 50 उमेदवारांचा खर्च केला आहे. ईडी भाजपची पैश्यांची ATM मशीन बनली आहे. पंतप्रधान कार्यालयाला याबाबत पत्र देत मी कळवले आहे. ईडीचे एजेंट पैसे वसूल करत आहे, याची माहिती मी पंतप्रधान यांना दिली आहे.

भाजपच्या कोणत्या नेत्यांची संपत्ती नरवलकडे आहे, हे लवकरच मी सांगेल. आमच्यावर धाडी टाकत अटक केली जाईल... करा आम्हाला अटक- राऊत

सुमित कुमार नरवल सामान्य व्यक्ती होता. त्याचे मलबार हिलमध्ये घर, मालमत्ता आहे.   ईडी त्यांच्यावर कारवाई का करत नाही?  त्यांची संपत्ती 2,3 वर्षात 8 हजार कोटी कशी झाली?- संजय राऊत 

मी पूर्ण पुरावे देणार, महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांची बेनामी संपत्ती त्याच्याकडे आहे, हे मी पंतप्रधान यांना सांगणार आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर कारवाई झाली. भाजप नेते काय रस्त्यावर भिक मागत आहेत का? 

महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठीच हा सगळा खटाटोप सुरु आहे. मी आता पर्यंत केंद्रीय यंत्रणांना ५० नावे पाठवली. किरीट सोमय्या यांनी एका केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात ईडीला १०० बोगस कंपन्यांची लिस्ट पाठवली आहे. त्याचे काय झाले.

जो पर्यंत मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत, तो पर्यंत केंद्रीय यंत्रणांना फक्त एकच काम असणार आहे. शिवसेनेच्या लोकांवर छापे टाका. देशातील सगळ्या लोकांच्या मनामध्ये शंका आहे की,महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्येच छापे टाकले जात आहेत. 

मुंबईत आज मोठ्या प्रमाणात छापे पडत आहेत. आमच्या काही लोकांवर आयकर विभागाचे छापे पडत आहेत. त्यांची भाणामती सुरु आहे.

संजय राऊत, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत पत्रकार परिषदेत दाखल

संजय राऊत यांच्या निशाण्यावर भाजपचा कोणता नेता,याची उस्तुकता

राऊत यांची पत्रकार परिषद सुरू होण्याआधीच शिवसेना नेत्यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागाचे छापे

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमवारी ट्वीट करत मंगळवारी दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. शिवसेना भवनमध्ये राऊत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामध्ये ते कोणावर निशाणा साधणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या आधीही संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपचे नेते किरीट समोय्या त्याचे पुत्र निल सोमय्या यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे आज राऊतांच्या निशाण्यावर कोण असणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com