बाळासाहेबांना आम्हीच शिवसेनेत आणल्याचा दावाही शिंदे गट करतील ; राऊतांचा टोमणा

उद्धव ठाकरे यांना आम्हीच पक्षप्रमुख केले असंही म्हणतील”, असे टोमणा संजय राऊतांनी यावेळी लगावला.
MP Sanjay raut
MP Sanjay rautSarkarnama

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Ed Summons Sanjay Raut) यांना ईडीकडून पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आला आहे. या समन्सनुसार ईडीने संजय राऊत यांना आज (20 जुलै) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर राऊत (sanjay raut) आज माध्यमांशी बोलत होते. (shivsena news update)

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे, त्यामुळे चौकशीसाठी आज उपस्थित राहु शकत नसल्याचे राऊतांनी ईडीला कळविले आहे. त्यांनी ईडीकडे ७ आँगस्टपर्यत मुदत मागितली आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटावर पुन्हा एकदा निशाणा साधला.

संजय राऊत म्हणाले, "“फुटीर गट चंद्रावरही कार्यालय स्थापन करतील, एवढ्या हवेत आहेत. या गटाला शिवसेना भवनाचा ताबा पाहिजे. मातोश्रीचा ताबा पाहिजे. सामनाचा ताबा पाहिजे. अशातऱ्हेने ते एकदिवशी जो बायडनचे घरही ताब्यात घेतील,"

MP Sanjay raut
shivsena : दुभंगलेली शिवसेना पुन्हा एक होईल ; निष्ठावंतांना आशा

"बाळासाहेब ठाकरेंचा मुळ पक्ष हा आमचाच आहे, किंबहूना बाळासाहेब ठाकरे यांना आम्हीच पक्षात आणलंय, असेही शिंदे गट आता सांगायला कमी करणार नाहीत. शिवाय उद्धव ठाकरे यांना आम्हीच पक्षप्रमुख केले असंही म्हणतील”, असे टोमणा संजय राऊतांनी यावेळी लगावला.

"फुटीर गट चंद्रावरही कार्यालय स्थापन करतील, एवढ्या हवेत आहेत. या गटाला शिवसेना भवनाचा ताबा पाहिजे. मातोश्रीचा ताबा पाहिजे. सामनाचा ताबा पाहिजे,"असे राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले..

  • या महाराष्ट्रात आणि देशात आता कधीही काहीही होऊ शकते. कारण ज्याप्रकारची लोकशाहीचे चित्र दिसतेय. त्यावरून तुम्ही काही विचार करू शकत नाही.

  • जी काय लढाई लढायची आहे ती लढूद्या. काल जो काय १२ खासदारांचा गट (फुटीर गट) भाजपाच्या प्रेरणेने आम्हाला सोडून गेला. ते कालपर्यंत आमचे सहकारी होते. आमचे मित्र होते. आजही त्यांना मी आमचे मित्र आणि सहकारी मानतो.

  • कोणत्या मजबुरूनी त्यांना आम्हाला सोडले हे माहितीये. यामागे राजकारणाचे कारण अजिबात नाही, हे त्यांनाही माहित आहे. प्रत्येकाची वेगळी मजबुरी आणि कारणे आहेत. बाकी हिंदुत्व आणि युती तोंडी लावायला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in