पूनम महाजनांसमोर राऊतांची माघार; नामर्द म्हणताच 'ते' ट्विट केलं डिलीट

संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना पूनम महाजनांनी जळजळीत ट्विट केलं आहे.
Poonam Mahajan, Sanjay Raut
Poonam Mahajan, Sanjay RautSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या भाषणावरून अजूनही फटाके फुटत आहेत. शिवसैनिकांशी संवाद साधताना त्यांनी भाजपसोबत 25 वर्ष वाया गेल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. मग शिवसेनेचे खासदार संजय राऊतही (Sanjay Raut) प्रत्युत्तर देण्यासाठी पुढे आहे. त्यासाठी त्यांनी एक जुनं व्यंगचित्र ट्विट केलं आणि याच व्यंगचित्रावरून वाद निर्माण झाला.

राऊतांनी ट्विटमध्ये कोण कोणामुळे वाढले? उघडा डोळे...बघा नीट.. असं म्हटलं होतं. तसेच ट्विटमध्ये पोस्ट केलेल्या व्यंगचित्रामध्ये बाळासाहेब ठाकरे हे एका खुर्चीवर बसल्याचे दिसते. तर त्यांचे पाय पुढील एका खुर्चीवर आहेत. त्यानंतर समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला ते हॅव अ सीट असं विचारत असल्याचे व्यंगचित्रावर लिहिण्यात आलं आहे. त्यांच्याच बाजूला एक छोटा स्टूल आहे. या व्यंगचित्रात बाळासाहेबांसमोरील व्यक्ती प्रमोद महाजन (Pramod Mahajan) असल्याचे भाजपच्या खासदार व महाजनांच्या कन्या पूनम महाजन (Poonam Mahajan) यांच्या ट्विटवरून स्पष्ट झाले.

Poonam Mahajan, Sanjay Raut
चित्रा वाघ म्हणतात, राऊतांचं गणित लहानपणापासूनच कच्चं...गिरे तो भी टांगे उपर!

राऊतांच्या या ट्विटवर पूनम महाजन चांगल्याचं संतापल्याचे दिसले. त्यांनी राऊतांना खणखणीत शब्दांत प्रत्युत्तर दिलं. 'स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका,' असं या ट्विटमध्ये म्हटले आहे. पूनम यांचे हे ट्विट राऊतांच्या टांगले जिव्हारी लागल्याचे दिसते. त्यामुळे काही वेळानंतर राऊतांनी आपलं ट्विटच डिलीट केलं.

युतीवरून काय म्हणाले होते राऊत?

भाजपच्या जन्माच्या आधी आमचे वाघ निवडून आले होते, फडणवीसांचा तेव्हा मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणाशी सबंध नव्हता. फडणवीसांच्या जन्माच्या आधीच्या या गोष्टी आहेत. शिवसेनेने भाजप पक्षाच्या जन्मतारखेचा दाखला आणला तर उत्तर देणे सोप होईल. जनतापक्षाचे पतन झाल्यानंतर १९८० मध्ये भाजपची स्थापना झाली. शिवसेनेचा जन्म १९६९ मधील आहे, असं राऊत यांनी नमूद केलं.

Poonam Mahajan, Sanjay Raut
आमदापपुत्रासह सात जणांच्या मृत्यूचे पंतप्रधान मोदींना दु:ख; मदतीची घोषणा

शिवसेनेचा पहिले महापौर हेमचंद्र गुप्ते होते ते कधी महापैार कधी होते ? किती नगरसेवक निवडून आले होते ? या संदर्भातील एखादं अभ्यास शिबीर रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये आयोजित करायला पाहिजे. कोणाला आस्वाद घ्यायचा असेल तर त्यांनाही येई द्या. वामनराव महाडिक पाहिले आमदार त्याच काळात निवडून आले , गिरगावात प्रमोद नवलकर, माजगावत छगन भुजबळ निवडून आले होते, असेही राऊत यांनी म्हटलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com