तुमचं ते गेट-टूगेदर आणि आमचं..! संजय राऊतांनी भाजपला सुनावलं

राज्यसभेच्या निवडणुकीवरून राज्यात घमासान सुरू आहे.
तुमचं ते गेट-टूगेदर आणि आमचं..! संजय राऊतांनी भाजपला सुनावलं
Sanjay Raut Latest Marathi News Sarkarnama

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीवरून राज्यात घमासान सुरू आहे. प्रत्येक मत महत्वाचं असल्यानं शिवसेनेकडून आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यावरून भाजपने शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या (BJP) टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांचे आमदार पक्षाच्या कार्यालयात बसले आहेत का, असा सवाल राऊतांनी केला आहे. (Sanjay Raut Latest Marathi News)

मुंबईत मंगळवारी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, सगळ्याच पक्षाचे नेते अशा निवडणुकांना एकत्र येत असतात. आमदारांना मतदान संदर्भात काही सूचना द्यायच्या असतात. विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकांच्या काही प्रक्रिया खूप तांत्रिक असतात त्या संदर्भात आमदारांना थोडं मार्गदर्शन करायचं असतं. (Rajya Sabha Election Latest News)

Sanjay Raut Latest Marathi News
काँग्रेसची एका आमदारासाठी धावपळ; राज्यसभेच्या उमेदवाराचे धाबे दणाणले

अशाप्रकारे भाजपनेही आपले आमदार ठेवलेले आहेत. त्यासाठी थोबाडावर प्रश्नचिन्ह उपस्थित करावं असं काय आहे. तुमचं ते गेट-टुगेदर आणि आमचं ते आम्ही आमदारांना बाजूला घेऊन गेलो. मुर्ख लोकं आहेत, अशा शब्दांत राऊतांनी भाजपला सुनावलं. शिवसेनेच्या दोन्ही जागांसह महाविकास आघाडीच्या चारही जागा निवडून येतील. दहा तारखेला सर्व चित्र स्पष्ट होईल, असंही राऊत यांनी सांगितलं.

भारताला पहिल्यांदा मागावी लागली माफी

नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपने त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. पण त्यांच्या वक्तव्यामुळे जगभरातील अनेक मुस्लिमबहुल देशांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले, प्रथमच या देशाला माफी मागावी लागली. अनेक देशांनी अत्यंत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

Sanjay Raut Latest Marathi News
राज्यसभा निवडणूक : अपक्ष आमदारांसाठी महाडिकांनी अशी लावलीय फिल्डिंग!

प्रथमच एका लहान देशाकडून मोठ्या देशाला माफी मागण्याचा आग्रह केला जातो आहे. भाजपने ज्या प्रकारचे विचार देशांमध्ये करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यातून त्यांचे नियंत्रण सुटले आहे. यांच्या लोकांवरच आणि हे लोक धर्मा धर्मात तेढ निर्माण करत आहेत आणि देशाची बदनामी सुरू आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in