MP Sanjay raut
MP Sanjay rautSarkarnama

Sanjay Raut यांना दिलासा मिळणार की पुन्हा कोठडी ; आज सुनावणी

Sanjay Raut : ईडीकडून राऊत हेच घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे.

Sanjay Raut : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेची मुलुखमैदान तोफ संजय राऊत सुमारे शंभर दिवसापासून आर्थर रोड कारागृहात आहेत. त्यांच्या जामीनावर आज (बुधवारी) सुनावणी होणार आहे. आज राऊतांना दिलासा मिळणार कि पुन्हा कोठडी मिळणार, याकडे सगळ्याचे लक्ष आहे. (Sanjay Raut news update)

ता. 31 जुलै रोजी संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. यांना कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतरपासून संजय राऊत हे आर्थर रोड कारागृहात आहेत. राऊतांना पोलिस कोठडी आणि नंतर त्यांची न्यायालयीन कोठडी झाली. तेव्हा पासून राऊत हे आर्थर रोड कारागृहामध्ये आहेत.

ईडीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांचा थेट हात आहे असा ईडीचा आरोप आहे. मात्र राऊतांचा या घोटाळ्याशी काहीच संबंध नाही असा युक्तीवाद राऊतांचे वकील करत आहेत. मात्र ईडीकडून राऊत हेच घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे.

MP Sanjay raut
NCP : सत्तारांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही ; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

आज या प्रकरणी पुढील सुनावणी केली जाणार आहे, आजच प्रविण राऊत यांच्या जामीनावर देखील सुनावणी होणार आहे. गेल्या सुनावणीच्या वेळी संजय राऊतांच्या जामीन अर्जावरील सुनावणीच्या वेळी राऊतांचे कुटुंब देखील कोर्टात उपस्थित होते.

राऊतांचा ईडीवर काय आरोप आहे?

  1. संजय राऊतांचे भाऊ प्रविण राऊत हे पत्राचाळ डेव्हलेपमेंटकडे लक्ष देत होते. त्या वेळी त्यांना एचडीआयएल ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले.

  2. यामधील 1 कोटी 6 लाख रुपये हे राऊतांच्या पत्नींच्या खात्यात पाठवण्यात आले. या पैशांमधून त्यांनी अलिबागेत जमीन खरेदी केली.

  3. पत्राचाळ प्रकरणात घोटाळा केल्यामुळे राऊत कुटुंबियांना मोठा फायदा झाला असा ईडीचा आरोप आहे.

  4. या पत्राचाळ डेव्हलपमेंटमध्ये प्रविण राऊत हे फक्त नावाला होते. मात्र यामागची सर्व सूत्र संजय राऊतच सांभाळत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com