उद्योगमंत्री आता प्रत्यक्ष उद्योग खात्यात कार्यरत नसतील! अरविंद सावंतांची खंत

सुभाष देसाई यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आलेली नाही.
Shiv Sena MP Arvind Sawant Latest Marathi News, Minister Subhash Desai
Shiv Sena MP Arvind Sawant Latest Marathi News, Minister Subhash DesaiSarkarnama

मुंबई : शिवसेनेने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना विधान परिषदेची उमेदवारी दिलेली नाही. देसाई यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांचं मंत्रिपदही जाणार आहे. बुधवारी शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यानंतर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. (Subhash Desai Latest Marathi News)

सावंत यांनी ट्विट करत देसाई यांनी घेतलेल्या निर्णयाचं कौतूकही केलं आहे. तसेच खंतही व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या मंदिरातील निष्ठावंत समई, करी उत्तम कारभार शांत संयमी..., असं म्हणत सावंत यांनी सुभाष देसाई यांच्या कार्याचा गौरव केला आहे. देसाई हे स्वत:हून बाजूला झाल्याचे देसाई यांनी नमूद केलं आहे. (Shiv Sena MP Arvind Sawant praises Subhash Desai)

Shiv Sena MP Arvind Sawant Latest Marathi News, Minister Subhash Desai
विधान परिषदेला डावलल्यानंतर पंकजा मुंडेंसाठी दिल्लीतून भाजपश्रेष्ठींचा खास निरोप

शिवसेना नेते, महाराष्ट्राचे उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी विधानपरिषद आमदार निवडप्रक्रियेत स्वत:हुन बाजुला होऊन इतरांना संधी देण्याचा निर्णय घेऊन आदर्श वस्तुपाठ घालुन दिला आहे. परंतु, खेद एवढाच वाटतो की प्रतिकुल परिस्थितीतही महाराष्ट्राचे उद्योग खाते अतिशय सक्षमपणे यशस्वी रित्या सांभाळणारे उद्योगमंत्री आता प्रत्यक्ष उद्योग खात्यात कार्यरत नसतील, अशी खंतही सावंत यांनी व्यक्त केली आहे.

प्रचंड क्षमता, कुवत असतानाही डांगोरा न पिटता शिवसैनिक म्हणून कार्य करणारे, आदर्श, शिस्त, निष्ठा, स्वामीनिष्ठा, समर्पण, नेमस्त या साऱ्या उपमा एकाच व्यक्तीच्या शिरपेचात स्वाभिमानाने डौलतात ते नेते म्हणजे आदरणीय सुभाष देसाई! कुठे थांबावे याचा आदर्श वस्तुपाठ देणाऱ्या आदरणीय सुभाष देसाई यांच्या निर्णयास प्रणाम, अशी भावना सावंत यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com