जित गये...! ही तर विजयाची नांदी; सर्वोच्च न्यायालयातही लढाई जिंकू : शिवसेनेची प्रतिक्रिया

मुंबईत दोन दिवसांपूर्वी झालेला गटप्रमुखांचा मेळावा तो झाँकी था, असली पिक्चर अभी बाकी है॒! न भूतो न भविष्यती असा या वर्षी दसरा मेळावा होणार आहे.
Manisha Kayande
Manisha KayandeSarkarnama

मुंबई : दसरा मेळाव्यासाठी (Dussehra Melava) शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानाची न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर शिवसेनेच्या (Shivsena) गोटातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी ‘जित गये’ अशी प्रतिक्रिया दिली असून उच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे विजयाची नांदी आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील लढाईदेखील आम्ही नक्की जिंकू’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Shiv Sena MLA Manisha Kayande's reaction to the High Court verdict)

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे, यासाठी शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून अर्ज करण्यात आले होते. मुंबई महापालिकेने दोघांनाही मैदान देण्यास नकार दिल्यानंतर शिवसेना उच्च न्यायालयातील गेली होती. त्यावर उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. त्यातून उच्च न्यायालयाने शिंदे गटाची याचिका फेटाळून लावत शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्क देण्याचे निर्देश मुंबई महापलिकेला दिले. त्यानंतर आमदार कायंदे बोलत होत्या.

Manisha Kayande
दसरा मेळावा : सत्य परेशान हो सकता है पराजित नही; उद्धव ठाकरेंचा दरारा कायम!

त्या म्हणाल्या की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून आम्हाला मनस्ताप देणे सुरू हेाते. आम्हाला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयातील लढाई अजून बाकी आहे. तीदेखील आम्ही जिंकू. पण उच्च न्यायालयाचा निकाल हा आमच्या विजयाची नांदी आहे. मुंबईत दोन दिवसांपूर्वी झालेला गटप्रमुखांचा मेळावा तो झाँकी था, असली पिक्चर अभी बाकी है॒! न भूतो न भविष्यती असा या वर्षी दसरा मेळावा होणार आहे.

Manisha Kayande
इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसने लावला निर्मला सीतारामन यांच्या ‘स्वागता’चा बॅनर!

यंदाच्या दसरा मेळाव्यात शक्तीप्रदर्शन होणारच. ते वेगळे पद्धतीने करण्याची आम्हाला गरज नाही. सामान्य शिवसैनिक कुठेही गेलेले नाहीत. आम्ही सर्वजण उद्धव ठाकरे यांच्यासोबत भक्कमपणे उभे आहोत. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. जे कटकारस्थान झाले आहे, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले, ते आमच्या जिव्हारी लागले आहे. ते शिवसैनिक कधीही विसरणार नाहीत, असेही कायंदे यांनी स्पष्ट केले.

Manisha Kayande
शरद पवारांच्या टीकेला सीतारामन यांनी बारामतीत येऊन असे दिले उत्तर

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कोणाचा तरी दबाव असणार आहे, त्यातूनच त्यांनी आमचा शिवाजी पार्क मैदानाचा प्रस्ताव फेटाळला असावा, असा आरोपही आमदार मनीषा कायंदे यांनी या वेळी बोलताना केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in