अश्लील व्हिडीओ पाठवून शिवसेना आमदाराला अडकवण्याचा ट्रॅप

त्याने आप महिला असल्याचं भासवत आमदाराकडे मदत मागितली
अश्लील व्हिडीओ पाठवून शिवसेना आमदाराला अडकवण्याचा ट्रॅप

मुंबई : शिवसेना आमदाराला (Shivsena MLA) सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. मौसमदीन मेव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मदत मागण्याच्या बहाण्याने या आरोपीने शिवसेना आमदाराला व्हिडीओ कॉल करत टेक्नोलॉजीचा दुरुपयोग करत त्यांचे व्हिडिओ बनवले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणला राजस्थानमधून (Rajsthan) अटक करण्यात आले आहे. तरुणाने युवती असल्याचे भासवत त्यांच्याशी चॅट सुरु केले. चॅटद्वारे त्याने आमदारांंकडे मदत मागितली. आमदारानेही त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. काही वेळाने आमदारांना एका महिलेचा व्हिडिओ कॉल केला. महिलेने सुमारे १५ सेकंद आमदारांशी बोलून मदतीबाबत चर्चा केली.

अश्लील व्हिडीओ पाठवून शिवसेना आमदाराला अडकवण्याचा ट्रॅप
आमदार शिंदेंनी मागितली माफी, पराभवामागे मोठे षडयंत्र

फोन कट केल्यानंतर काही मिनिटातच त्यांच्या मोबाईलवर एक व्हिडीओ आला ज्यात आमदाराचे काही अश्लील व्हिडीओ होते. हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने आमदाराकडून 50 हजार रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली. हा तरुण शिवसेना आमदाराला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ​​होता, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तरुणाला अटक करून मुंबईत आणण्यात आले आहे.

या प्रकरणी आमदाराने मुंबईत पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी याचा शोध घेतला असता राजस्थानातील भरतपूर मधून त्याने संबंधित आमदाराला कॉल केल्याचे आढळून आले. यानंतर मुंबई पोलिसांनी भरतपूर येथील सिकारी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. सिकारी पोलिस ठाण्याच्या पथकाने आरोपीला त्याच्या गावातून ताब्यात घेतले. लवकरत या आरोपीचा ताबा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला देणार आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in