राज ठाकरेंचं भाषण वैचारिक, खिल्ली उडवू नका! भास्कर जाधवांच्या मनात काय चाललंय?

राज ठाकरे यांनी पुण्यातील भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवरही टीका केली आहे.
Bhaskar Jadhav, Raj Thackeray Latest Marathi News
Bhaskar Jadhav, Raj Thackeray Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पुण्याती भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली. तसेच अयोध्या दौरा स्थगित करण्यामागचं कारण सांगताना त्यांनी तेथील भाजप खासदाराला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेल्याचा आरोप केला. या भाषणावर शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (MLA Bhaskar Jadhav Latest Marathi News)

भास्कर जाधव यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचं कौतुक करताना त्याची खिल्ली न उडवण्याचे आवाहन महाविकास आघाडीतील नेत्यांना केलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भाषणामुळे भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायेच दात वेगळे असल्याचे समोर आले आहे, अशी टीकाही जाधव यांनी केली आहे. (Shiv Sena MLA Bhaskar Jadhav praises MNS Chief Raj Thackerays speech)

Bhaskar Jadhav, Raj Thackeray Latest Marathi News
मुख्यमंत्री ठाकरेंचं ठरलं! राज्यसभेसाठी सहावा उमेदवार कट्टर शिवसैनिकच असणार

काय म्हणाले भास्कर जाधव?

राज ठाकरे यांच्या भाषणात अनेक अर्थ दडले आहेत. ते सर्वांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. विशेषत: महाविकास आघाडीला मी विनंती वजा आवाहन करेन की, कालचं राज ठाकरे यांचं भाषण आणि रद्द झालेला अयोध्या दौरा हा कुणीही हवा देण्याचं काम करू नये. चेष्टेने घेऊ नये. राज ठाकरेंनी कालचं भाषण राजकीय प्रगल्भतेने आणि वैचारिक पध्दतीने केलं. परिपक्व राजकारणी होऊन त्याकडे बघण्याची गरज आहे, असं जाधव म्हणाले आहेत.

एमआयएम ही बी टीमचं आहे. ओवेसी यांनी सांगितले आहे की, राज ठाकरेंच्या कुठल्याही वक्तव्यावर प्रतिक्रिया देऊ नये. याचा अर्थ खूप मोठा खोल आहे. म्हणून रद्द केलेल्या दौऱ्याची खिल्ली न उडवता त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे. भाजपच्या एका खासदाराला तिथले मुख्यमंत्री गप्प करू शकत नव्हते का, असं राज ठाकरे बोलले. याचा अर्थ कुणीही आपल्या अंगावर घेण्याचा प्रयत्न करू नये. यानिमित्त भाजपचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, हे दिसले, अशी टीका जाधव यांनी केली.

Bhaskar Jadhav, Raj Thackeray Latest Marathi News
राजकारण, विश्वासार्हता म्हणजे काय रे भाऊ? आव्हाडांनी राज ठाकरेंना समजावून सांगितलं...

भाजपचं खरं रूप काय, त्यांनी काढलेली नखं राज ठाकरेंनी वेळीच ओळखली म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय हे भाषण राजकीय प्रगल्भतेने घेण्याची गरज आहे. भाजप जी बी, सी टीम करत होती, ती सी टीम भाजपासून वेगळी करण्याची संधी आली आहे, अशा अर्थाने त्याकडे पाहिलं पाहिजे. राज ठाकरेंना हिणवण्याच्या अर्थाने त्याकडे बघू नये, असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

माझी अयोध्या दौऱ्यांची तारीख ज्यांना तारीख खुपली, त्यांनीच हा सापळा रचला. त्यांना आमचं हिंदुत्व , भोंगे झोंबले, म्हणून त्यांनी हे केलं. उत्तरप्रदेशातील एक खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन देतो. माफी मागण्यास सांगतो, हे त्यांना आता कसे आठवलं ? अयोध्या दौऱ्यात माझ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केलं असते, कार्यकर्त्यांना जेलमध्ये सडवलं असतं. ऐन निवडणुकीच्या वेळी मला कार्यकर्त्यांना गमावायचे नाही. माझी महाराष्ट्राची ताकद मी गमविणार नाही. मी वाटेल ती टीक सहन करण्यासाठी तयार आहे. माझ्या कार्यकर्त्यांना मी हकनाक गमवणार नाही, पण यामुळे चुकीचे पायंडे पडत आहेत," असे राज ठाकरे म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com