हिंदुत्वापाठोपाठ हिंदूजननायकसाठी चढाओढ! शिवसेना नेत्यांकडून उद्धव ठाकरेंनाही उपाधी

राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना विरूध्द मनसे असा वाद रंगला आहे.
CM Uddhav Thackeray, Vijay Shivtare, Shivajirao Adhalrao Patil
CM Uddhav Thackeray, Vijay Shivtare, Shivajirao Adhalrao PatilSarkarnama

मुंबई : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना विरूध्द मनसे असा वाद रंगला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा, मशिदीवरील भोंगे अन् हनुमान चालीसा वादानंतर मनसैनिकांनी त्यांना हिंदूजननायक ही उपाधी दिली. आता शिवसेनेकडूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदूजननायक ही उपाधी दिली आहे. (CM Uddhav Thackeray Latest Marathi News)

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) व माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून उद्धव ठाकरेंना हिंदूजननायक म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंची येत्या 14 मे रोजी मुंबईच्या बीकेसी मैदानात सभा होणार आहे. या सभेबाबत या नेत्यांनी बॅनर तयार केले असून त्यावर ठाकरेंना हिंदूजननायक ही उपाधी दिली आहे. (MNS Raj Thackeray Latest Marathi News)

CM Uddhav Thackeray, Vijay Shivtare, Shivajirao Adhalrao Patil
चिंतन शिबीराआधी काँग्रेसचा माजी केंद्रीय मंत्र्याला दणका; पक्षातून केलं निलंबित

शिवसेना नेत्यांच्या या बॅनरवाजीवरून पुन्हा एकदा शिवसेना व मनसे आमनेसामने आले आहेत. मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या या उपाधीवरुन शिवसेनेवर टीका केली आहे. ते म्हणाले, राज ठाकरे अयोध्येला निघाले की यांचा दौरा जाहीर, राज ठाकरेंनी सभा घेतली की हे पण सभा करणार, हे मनसेचे नगरसेवक चोरणार, हे मनसेचे सभेच्या गर्दीचे फोटो चोरणार, आता तर कहर! 'हिंदूजननायक' ही पदवी पण चोरत आहेत! स्वतःचं काहीतरी 'असली' करणार का नाही? असा सवाल त्यांनी विचारला.

हिंदुत्वानंतर आता हिंदूजननायक या उपाधीवरूनही शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसत आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंग्यांवर आक्षेप घेत पुन्हा हिंदुत्वाचा मुद्या तापवला आहे. शिवसेना लक्ष्य करण्यासाठी मनसेसह भाजपनेही उडी घेतली आहे. तर शिवसेनेकडूनही असली-नकलीचा मुद्दा पुढे करत विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com