गोव्यात शिजतेय वेगळीच खिचडी! संजय राऊतांनीच केलं उघड...

गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अद्याप आघाड्यांबाबत चित्र स्पष्ट झालेले नाही.
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama

मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये (Goa Election 2022) महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस उत्सुक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच तृणमूल काँग्रेसचा (TMC) प्रस्तावही काँग्रेसनं धुडकावला आहे. त्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भाजपविरोधी आघाडीचे संकेत दिले. तर अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व शिवसेनेच्या (Shiv Sena) आघाडीचे भिजत घोंगडे आहे. त्यामुळे गोव्यातील राजकीय स्थितीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

गोव्यातील या राजकीय स्थितीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी भाष्य केलं. माध्यमांशी बोलताना त्यांनी गोव्यात वेगळीच खिचडी शिजत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, गोवा हे अत्यंत लहान राज्य आहे. गोव्यात कुणालाच बहुमत मिळणार नाही. तिथे वेगळ्या प्रकारची खिचडी शिजत आहे. प्रत्येक जण आपलले एक-दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यानंतर ज्याचे सरकार येईल, तिकडे घुसतील, असं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे.

Sanjay Raut
सगळीच येड्यांची जत्रा; चंद्रकांतदादांच्या आव्हानाची राऊतांनी काढली हवा

शिवसेना व राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत बोलताना ते म्हणाले, गोव्याला उद्या जाणार आहे. आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करू. राष्ट्रवादीसोबत आम्ही चर्चा करणार आहे. त्यांची यादीही जाहीर केली जाईल. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आज तिथे पोहचत आहेत, असे राऊत यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवारांची उद्या घोषणा केली जाऊ शकते, असे संकेत राऊतांनी दिले.

चंद्रकांत पाटील यांना टोला

गोवा विधानसभा निवडणुकीत उत्पल पर्रीकर यांना पाठिंब्याची चर्चा करण्यापेक्षा हिंमत असेल तर खासदार संजय राऊत यांनी स्वत: गोवा विधानसभा निवडणुकीला उभे राहावे, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले होते. त्यावर राऊतांनी पलटवार करत सगळीच येड्यांची जत्रा अशी टीका केली आहे. तसेच राऊतांनी ट्विट करत चंद्रकांतदादांना निवडणुकीबाबत माहितीही दिली आहे.

Sanjay Raut
Video : भाषणादरम्यान टेलिप्रॉम्प्टर बंद पडताच पंतप्रधान मोदींची उडाली तारांबळ

पाटील यांच्या या आव्हानावर राऊतांनी ट्विट केलं आहे. 'सगळीच येड्यांची जत्रा : संजय राऊत यांनी गोव्यात जाऊन निवडणूक लढवावी. इति चंद्रकांत पाटील.. कोणत्याही विधानसभेमध्ये निवडणूक लढवायची असेल तर त्या राज्याच्या मतदार यादीत मध्ये नाव असणे गरजेचे असते, एवढे भाजप नेत्यांना माहिती नाही, याचे आश्चर्य वाटते. ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो,' असं राऊतांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com