श्रीमान केसरकर, आपण यांना ओळखता ना! गुलाबरावांचा व्हिडीओ ट्विट करत राऊतांनी डिवचलं

केसरकर यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली होती.
Sanjay Raut Latest News, Gulabrao Patil Latest News
Sanjay Raut Latest News, Gulabrao Patil Latest NewsSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना प्रामुख्याने दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील यांना डिवचलं आहे. राऊत यांनी गुलाबराव यांचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ ट्विट केला आहे. 'बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा, असं म्हणत राऊतांनी डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका, असं आवाहनही केलं आहे. (Sanjay Raut Latest Marathi News)

राऊत यांच्याकडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह बंडखोर आमदारांवर सातत्याने जोरदार निशाणा साधला जात आहे. अत्यंत कठोर भाषेत ते आमदारांना लक्ष्य करत आहेत. सोमवारी सकाळी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा..श्रीमान केसरकर, थोडा संयम ठेवा. डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका. आपण यांना ओळखता ना? जय महाराष्ट्र!,' असं राऊतांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Sanjay Raut Latest News, Gulabrao Patil Latest News
आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर! एकनाथ शिंदेंची डरकाळी

व्हिडीओमध्ये गुलाबराव काय म्हणतात?

गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा एका कार्यक्रमातील भाषणाचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये गुलाबराव पाटील म्हणत आहेत की, शिवसेनेमध्ये (Shiv Sena) पुंगी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले. शिवसेनेमध्ये रिक्षा चालवणारे दिलीप भोळे आमदार झाले. तर पानटपरी चालवणारे गुलाबराव पाटील तुमच्यासमोर मंत्री म्हणून बोलतोय. अरे हे सोडा सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले. 'कतलिया कही साप बदल लेते है, पुण्य की आड में पाप बदल लेते है, मतलब के लिए कई लोग अपने बाप बदल लेते है', असं जोरदार भाषण गुलाबराव पाटील यांनी केलं होतं.

दरम्यान, रविवारी दहिसर येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गुलाबराव पाटलांवर जळजळीत टीका केली. पाटील हे आमदार होण्याआधी पानटपरी चालवायचे त्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले मात्र ते आता पुन्हा पानटपरीवर बसतील, अशी टीका केली आहे.

राऊत म्हणाले की, गुलाब पाटील हे असे भाषण करायचे की, शिवसेनेमध्ये कोणी वाघच नाही जणू हे एकटेच वाघ असल्यासारखे ते वागायचे मात्र, ते पळून गेले. ते म्हणायचे की, मी पानटपरीवाला मला कॅबिनेट मंत्री केलं आता तुम्हाला पुन्हा पानटपरीवर बसाव लागेल. हे महाभारतातल्या संजयचे वक्तव्य आहे. हे लक्षात ठेवा. मी बाळासाहेबांच्या पायाशी बसून सुमारे 30 वर्ष काम केलं आहे. माझा शब्द कधी खोटा होत नाही. अश्या शब्दात राऊतांनी पाटलांवर हल्लाबोल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com