आज मुक्काम पोस्ट अलिबाग! संजय राऊतांची ईडीला हुलकावणी

पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीने राऊतांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावले होते.
Sanjay Raut Latest Marathi News
Sanjay Raut Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावले होते. पण राऊत हे आज ईडी (ED) कार्यालयात जाणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे. तसं पत्र त्यांनी ईडीला दिलं असून पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे येता येणार नाही, असं म्हटलं आहे. (Sanjay Raut Latest Marathi News)

राऊतांनी ईडीला पत्र लिहून पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने आज चौकशीला अनुपस्थित राहण्याची परवानगी राऊतांनी मागितली आहे. ईडीला तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याची भूमिका राऊतांनी मांडली आहे. राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी ही माहिती दिली.

Sanjay Raut Latest Marathi News
जहालत, एक किस्म की मौत है और..! संजय राऊतांकडून बंडखोर आमदारांवर पुन्हा हल्ला

राऊत अलिबागच्या दौऱ्यावर

एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे आज अलिबागच्या दौऱ्यावर आहेत. कोकणातील शिवसैनिकांचा मेळावा याठिकाणी घेण्यात येणार आहे. माजी खासदार अनंत गीतेही उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुख यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार असल्याची माहिती राऊतांनीच ट्विटरवरून दिली आहे. आज मुक्काम पोस्ट अलीबाग असं त्यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

पत्राचाळ य़ेथील जागा म्हाडाने विकसनासाठी दिली होती. त्याबदल्यात वाधवान बिल्डर्सला एफएसआय देण्यात आला होता. पण वाधवान बिल्डर्सने एफएसआय इतरांना विकला. त्याबदल्यात पैसे घेतले. तसेच विकसनाच्या नावाखाली बँकेकडून हजारो कोटींचे कर्ज घेतले. त्यातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला.

याप्रकरणी म्हाडासह इतर बिल्डरांचेही नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने याची चौकशी सुरू झाली. प्रविण राऊत यांना त्यानंतर अटक करण्यात आली. राऊतांच्या माध्यमातून संजय राऊतांच्या पत्नीला पन्नास लाख रुपये दिल्याचे चौकशीत समोर आले होते. या प्रकरणात आता संजय राऊतांचाही संबंध असल्याचा ईडीला संशय आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com