Ramdas Kadam cried : पवारांनी डाव साधल्याचा आरोप करत कदम ढसाढसा रडले!

उद्धव ठाकरे यांनी कदमांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
Shiv Sena Leader Ramdas Kadam Latest News
Shiv Sena Leader Ramdas Kadam Latest NewsSarkarnama

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ज्येष्ठ नेते रामदास कदम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पण त्याआधीच त्यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला होता. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करत कदम यांना पुन्हा नेतेपद दिलं. पण हकालपट्टीमुळे कदम चांगलेच निराश झाले आहेत. शिवसेनेसाठी आम्ही 52 वर्ष सर्वकाही केलं, असं सांगताना कदम यांना अश्रू अनावर झाले. (Ramdas Kadam Latest News)

कदम यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरेंवरही (Aaditya Thackeray) निशाणा साधला. ते म्हणाले, माझ्यावर नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल, असं 52 वर्षात कधीच वाटलं नाही. पण शरद पवारांनी (Sharad Pawar) डाव साधत पक्ष फोडला. तरीही उद्धव ठाकरेंना पवार आणि सोनिया गांधींनी सोडवत नाही. पक्ष फुटत असताना शरद पवार कशासाठी हवे आहेत, असा सवालही कदम यांनी केला.

Shiv Sena Leader Ramdas Kadam Latest News
शिंदेंचा दे धक्का; सांगलीचे जिल्हाप्रमुख म्हणून आनंदराव पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब

मी राजीनामा दिला असला तरी खूप अस्वस्थ आहे. पक्षात 52 वर्षे लढणारा नेता राजीनामा देतो, याचा विचार पक्षप्रमुखांनी करायला हवा. मी आनंदी नाही, वेदना होत आहेत. राष्ट्रवादीसोबत जाऊ नका, असं हात जोडून सांगितले होते. पण उद्धव ठाकरे बोळे आहेत. त्यांना पवारांचा डाव कळला नाही, अशी टीकाही कदम यांनी केली.

आमदारांच्या नाराजीची नोंद उद्धव ठाकरे यांनी घेतली असती तर ही वेळच आली नसती. पक्षातून किती जणांची हकालपट्टी करणार, असा सवाल करत कदम यांनी तुमच्या आजुबाजूला कोण आहे हे आधी पहा, असं आवाहनही केलं. एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला असताना त्यांच्याशी बोललो. पण त्यात यश आलं नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आजुबाजूच्या चौकडीला बाजूला करावं, असं कदम म्हणाले.

Shiv Sena Leader Ramdas Kadam Latest News
Shiv Sena News : राहुल शेवाळेंना मिळणार 'गिफ्ट'? शिंदे पंतप्रधान मोदींकडे शब्द टाकणार

आदित्य ठाकरे यांनी माझंच मंत्रालय घेतल्याचे सांगत कदम यांनी नाराजी व्यक्त केली. ते मला काका-काका म्हणायचे. पण त्यांनीच माझं मंत्रालय घेतलं. मंत्रालयात येऊन ते बैठका घ्यायचे. पण ठाकरे असल्यानं आम्ही ते सहन केलं, अशी भावना कदम यांनी व्यक्त केली. पण एवढं असूनही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कदम यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in