बाबरी कुणी पाडली? फडणवीसांच्या टीकेवर राऊतांकडून थेट अडवाणींचा 'तो' व्हिडिओ ट्विट

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Sanjay Raut, Devendra Fadnavis
Sanjay Raut, Devendra Fadnavissarkarnama

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वावरून भाजप (BJP) आणि शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. आता बाबरी मशीद कोणी पाडली यावरुन भाजप-शिवसेनेच्या नेत्यांमधील वाद भडकला आहे. भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (ता.1 मे) मुंबईतील सोमय्या मैदानावर झालेल्या बुस्टर सभेत यावरूनच शिवसेनेवर टीका केली. बाबरी पडली त्यावेळी शिवसेनेचे नेते कोणत्या बिळात होते, असे म्हणत त्यांनी शिवसेनेसा डिवचले आणि बाबरी पडली तेव्हा शिवसेनेचा एकही नेता तिथे उपस्थित नव्हता, असा घणाघात शिवसेनेवर केला.

यावर शिवसेकडून प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली असून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) थेट भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (LK Advani) यांचा व्हिडिओ आणि बाबरी पडली तेव्हाच्या सामना वृत्तपत्राच्या बातम्याचे कात्रणच ट्विट करत बाबरी कोणी पाडली? ऐका.. आणि आता बोला.. अब बोलो.., असे कॅप्शन देत फडणवीसांना पत्युत्तर दिले आहे.

Sanjay Raut, Devendra Fadnavis
राज ठाकरेंना अटक करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

फडणवीसांनी आपल्या भाषणात बाबरी पडली तेव्हा तिथे एकही शिवसैनिक तिथे नव्हता,असे म्हणत शिवसेनेला डिवचले होते. त्यांच्या या टीकेला राऊतांनी थेट भाजपचे ज्येष्ठ नेते अडवाणींचा एका न्यूज चॅनलच्या मुलाखतीत बाबरी मशीद पाडण्याच्या विषयावर बोलतानाचा २९ डिसेंबर २००० चा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये अडवाणींनी मराठी भाषिकांचा उल्लेख केला असून त्यावरुन तिथे मराठी लोक म्हणजे शिवसैनिक असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न राऊतांनी केला आहे. तर, आणखी एक ट्विट करत राऊतांनी त्यामध्ये सामना वृत्तपत्राच्या बातम्याचे कात्रणांचे फोटो टाकले. यामध्ये 'शिवसेना कार्यकर्ता बॉम्ब घेऊन अयोध्येला जाणार', 'शिवसेना प्रदेश प्रमुखांच्या घरावर छापा', 'खवळलेल्या हिंदू महासागराने रामजन्मभूमीचा ताबा घेतला', अशा मथळ्याच्या बातम्यांचे कात्रण आहेत. या ट्विटला 'आता बोला..' असे कॅप्शन देण्यात आले आहे. यावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Sanjay Raut, Devendra Fadnavis
अल्टिमेटम देणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचा इशारा: हे कायद्याचे राज्य...

दरम्यान, राऊतांनी ट्वीट केलेल्या व्हिडिओत अडवाणी मुलाखत देतांना म्हणतात की, "बाबरी पाडणे ही खूप मोठी चूकी होती. यामध्ये काही शंका नाही. मी आधी उमा भारतींना तिथे पाठवलं आणि सांगितलं की, बाबरीवरील लोकांना खाली उतरवा. त्यांना सांगा की असे काही करु नका. जेव्हा त्या परतल्या आणि मला सांगितलं की मशिदीवर काही लोक आहेत आणि ते 'मराठी'त बोलत आहेत. ते माझं ऐकत नाही. त्यानंतर मी प्रमोद महाजन यांना पाठवले. ते तिथे गेले. मात्र, तेही हताश होऊन परत आले. त्यांनंतर मी माझ्यासोबतच्या पोलिसांना सांगितलं की मला तिथे जायच आहे. पण, ते मला म्हणाले की आम्ही तुम्हाला त्याची परवागनी देऊ शकत नाही".

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com