संजय राठोडांचे कमबॅक निश्चित; मुख्यमंत्र्यांनीच दिला शब्द

पूजा चव्हाण या तरूणीच्या मृत्यूनंतर राठोडांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
संजय राठोडांचे कमबॅक निश्चित; मुख्यमंत्र्यांनीच दिला शब्द
Sanjay Rathod Latest Marathi News and CM Uddhav Thackeray Latest Marathi News File Photo

मुंबई : शिवसेनेचे (ShivSena) माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळावे, या मागणीसाठी पोहरादेवीच्या महंतांनी शुक्रवारी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणात क्लिनचिट मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देणार असल्याचा शब्द दिल्याची माहिती पोहरादेवीच्या महंतानी दिला आहे. त्यामुळे आता राठोडांचे मंत्रिमंडळातील कमबॅक निश्तित मानले जात आहे. (Sanjay Rathod Latest Marathi News)

पोहरादेवी येथील महंत बाबूसिंग राठोड त्याचप्रमाणे मेहताब सिंग नाईक, अॅड. अभय राठोड, पोपट चव्हाण व बंजारा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच राठोडांवरील आरोपांबाबत पोलीस अहवालाच्या मागणीसाठी पोहरादेवी संस्थानचे सहा महंत पुण्याच्या पोलीस आयुक्तांना भेटले होते.

Sanjay Rathod Latest Marathi News and CM Uddhav Thackeray Latest Marathi News
Presidential Election : भाजपनं भारती पवार अन् विनोद तावडेंना लावलं कामाला

या भेटीत पुणे पोलिस आयुक्तांनी संजय राठोड निर्दोष असल्याची माहिती दिली असल्याचा दावा महंतानी केला होता. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेवून राठोड यांना पुन्हा मंत्रीपद द्यावे, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

या भेटीबाबत बोलताना महंत बाबूसिंग महाराज म्हणाले की, संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात यावे, यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो. समाजाच्या भावना लक्षात घेवून मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती महंतांनी दिली.

Sanjay Rathod Latest Marathi News and CM Uddhav Thackeray Latest Marathi News
नुपूर शर्मांना अटक करण्यासाठी मुंबई पोलीस चार दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून

आम्ही पुण्याच्या पोलीस आयुक्तांना भेटलो. पोलिसांच्या अहवालामध्ये अपघाती मृत्यू असल्याचे कायम ठेवले आहे. हा अहवाल आम्हाला मिळाला आहे. यात संजय राठोडांचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे, असे अभय राठोडांनी सांगितले. दरम्यान, पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीच्या मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यावरून राज्याचं राजकारण बरंच तापलं होतं.

पोहरादेवीच्या विकासाला गती मिळणार

देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकास कामास गती द्यावी आणि त्याचा कालबध्द आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी दिल्या. पोहरादेवी तीर्थक्षेत्राचे काम रखडता कामा नये. वेळच्या वेळी यासाठी निधी दिला जात असला तरी कालबध्द रीतीने कामे पण पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सिताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदींची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in