एकनाथ शिंदे नारायण राणे होतील : शिवसेना नेत्याने आधीच सांगितले होते...

दिवंगत नेते अनंत तरे यांनी एकनाथ शिंदेबाबत केलेली भविष्यवाणी अगदी तंतोतंत खरी ठरली आहे.
Narayan Rane, Eknath Shinde Latest Marathi News
Narayan Rane, Eknath Shinde Latest Marathi NewsSarkarnama

Eknath Shinde : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. त्यांनी चार अपक्ष आमदारांसह शिवसेनेच्या सुमारे 30 आमदारांना सोबत घेत बंडखोरी करून गुवाहाटीला गेले आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे (Shivsena) दिवंगत नेते अनंत तरेंची (Anant Tare) 2013 ची माध्यमाला दिलेल्या प्रतिक्रियेची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर (Social media) चांगलीच व्हायरल होत असून यामध्ये तरे यांनी एकनाथ शिंदेबाबत केलेली भविष्यवाणी अगदी तंतोतंत खरी ठरली आहे.

एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करत आहेत. याबाबत आपण उद्धव ठाकरेंना सांगितले आहे की, शिंदेना आवरा अन्यथा हा दुसरा नारायण राणे होईल, अशी सूचना त्यांनी ठाकरे यांना केली होती. दरम्यान, तरे यांनी केलेल्या त्या वक्तव्याची सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर चर्चा चांगलीच रंगत आहे. (Uddhav Thackeray, Eknath Shinde Latest Marathi News)

Narayan Rane, Eknath Shinde Latest Marathi News
Eknath Shinde ठाम : शिवसैनिक भरडला गेलाय... महाविकास आघाडी सोडायलाच हवी!

2013 साली तरे यांनी प्रसार माध्यमाला शिंदेविरोधात दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले होते की, एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करत आहेत. याबाबत मी उद्धवजींना सांगितले आहे की, शिंदेना आवरा नाहीतर हा दुसरा नारायण राणे होईल. शिंदे अश्यापद्धतीने काम करतोय की, आपले आपले निवडतोय आणि दुसऱ्यांना बाजूला करत आहे, असे तरे म्हणाले होते. ही क्लिप मुंबईचा शिवसैनिक या ट्विटर आकाउंटवर शेअर करण्यात आली असून शिंदेच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर सोशल माध्यमांवर ही क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे.

आज या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांनी समोर येवून राजीनाम्याची मागणी करा. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही, असे म्हणतं त्यांनी भावनिक आवाहन केले आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थान म्हणजे 'वर्षा' बंगला सोडण्याचा निर्णय घेतला असून ते आजच 'मातोश्री' या आपल्या खासगी निवासस्थानी जाणार आहेत. त्याच्या स्वागतासाठी 'मातोश्री'वर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे.

Narayan Rane, Eknath Shinde Latest Marathi News
Bhumre : आता उद्धवसाहेब नाही, शिंदेसाहेब सांगतील तो आदेश पाळू..

दरम्यान, ठाकरे यांनी केलेल्या भावनिक आवाहनानंतरही शिंदे यांच्याकडून आतापर्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसून उलट आघाडी सोबत युती करून घटक पक्षांनाच जास्त फायदा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता या नाराजी नाट्याचे महाविकास आघाडी सरकारवर काय परिणाम होतो. हे बघण औस्तुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in