एकनाथ शिंदेंची नाराजी कायम? सेना नेत्यांनी आग्रह करूनही बोलले नाहीत!

शिवसेनेचा 56 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
Eknath Shinde Latest Marathi News
Eknath Shinde Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असल्याचे सुचक संकेत पुन्हा एकदा मिळाले आहेत. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमातच त्याची प्रचिती आल्याने चर्चांना उधाण आलं आहे. कार्यक्रमात भाषण करण्याचा आग्रह सेना नेत्यांनी करूनही ते बोलले नाहीत. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

शिंदे यांना मानणाऱ्या समर्थक आमदारांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरूवात केल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. त्यांनी आपला रोख युवासेनेचे नेते, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या दिशेने ठेवल्याचे मानले जात आहे. त्यातच वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शिंदे यांनी भाषण करण्यास नकार दिल्याने शिवसेनेत अंतर्गत धुसफुस असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Eknath Shinde Latest Marathi News
हिंदुस्थान पेटणार..! भाजप नेत्याकडून राहुल गांधींचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

वर्धापनदिन कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी भाषण करावे, असा आग्रह नेत्यांचा होता. मात्र, शिंदे यांनी भाषण करण्यास नकार दिल्याचे समजते. काल आमदारांची मतदान ट्रायल झाली. यावेळी नेतृत्व उपस्थित असायला हवे, अशी एकनाथ शिंदे यांची भावना होती. पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेना आणि अपक्ष आमदारांची मतदानाची ट्रायल घेण्यात आली होती. त्यावरूनही शिंदे यांची नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

शिंदे समर्थक आमदारही नाराज

ऐन विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावरच शिंदे समर्थक आमदारांनी उघडपणे नाराजी मांडत आहेत, याचा परिणाम शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. या धुसफुशीचा फायदा घेण्यावर भाजपने आधीच डोळा ठेवला आहे. त्यात आता शिंदे समर्थक आमदारांच्या नाराजीची भर पडली आहे. मात्र पक्षात कुठचेही मतभेद नाहीत. सगळी मंडळी एकत्र येऊन काम करत आहोत. विधान परिषद निवडणुकीत विजयासाठी झटत आहोत, असे सांगून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षात काडीचेही मतभेद नसल्याचे, 'वेस्टलीन'... (रेनिन्सस) या हॉटेलमध्येच जाहीर केले.

Eknath Shinde Latest Marathi News
मेहबूब शेख प्रकरणाला नवे वळण; चित्रा वाघांविरोधात आणखी एका पिडीतेचा गौप्यस्फोट

शिवसेनेमध्ये शिंदे समर्थक आमदारांची संख्या किमान दीड ते दोन डझन आहे. हे आमदार शिंदे यांच्या शब्दापलीकडे जात नाहीत. अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जरी काम असले; तरीही हे आमदार आधी शिंदे यांनाच भेटतात. शिंदे सोडून हे आमदार शिवसेनेच्या एकाही मंत्र्यांना हे आमदार जुमानत नाहीत. अर्थात, कितीही महत्वाची कामे असली तरीही शिंदे यांच्याशिवाय हे आमदार इतरांच्या खात्यामध्ये फिरकतही नाहीत. शिंदे यांच्याशी स्पर्धा असलेल्या किंवा त्यांच्या विरोधी गटातील मंत्री, आमदारांशी शिंदे समर्थक आमदार फटकून वागतात. त्यातच राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीनिमित्त ठाकरे यांच्यापासून सारेच मंत्री पक्षाच्या आमदारांशी जवळीक साधून आहेत.

Eknath Shinde Latest Marathi News
भाजपच्या डोक्यात खडसेंचा गेम? : नाथाभाऊंना आमदार करण्याचा अजितदादांचा निर्धार

पण अपक्ष आमदारांसारखेच शिंदे समर्थक आमदारांमध्ये नेतृत्वाबाबत प्रचंड नाराजी आहे. गेली अडीच वर्ष आम्हाला फारशी किंमत दिली जात नव्हती. आता मात्र आम्हाला नव-नवे आदेश देऊन, आमच्यावर अविश्वास दाखविला जात आहे, अशी भावना शिंदे समर्थक आमदारांची खाजगीत मांडत आहेत. ती शनिवारच्या बैठकीत पुन्हा एकदा उघड झाली. त्यामुळे शिवसेनेचे नेतृत्व आणि शिंदे समर्थक आमदारांमध्ये दरी वाढण्याची भीती आहे. त्यात आमदारांच्या बैठकीत काही बाबींवर आक्षेप घेत शिंदे यांच्याकडे तक्रार केली आणि त्यातून मतभेद असल्याचे पुढे आले. एकीकडे भाजपकडून फोडाफोडीची शक्यता असतानाच शिंदे समर्थक आमदारांनी नेतृ्त्वाच्या दिशेने बोट दाखविल्याने शिवसेना नेत्यांची अक्षरशः झोपच उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com