एकनाथ शिंदे अन् मिलिंद नार्वेकरांनी संजय पांडेंची भेट घेत काय सांगितलं?

मुंबई शहर पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती करण्यामागे भाजपला धडा शिकवण्याची शिवसेनेची भुमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
Eknath Shinde, Milind Narvekar, Sanjay Pandey
Eknath Shinde, Milind Narvekar, Sanjay PandeySarkarnama

मुंबई : मुंबई शहर पोलीस आयुक्तपदी संजय पांडे (Sanjay Pandey) यांची नियुक्ती करण्यामागे भाजपला धडा शिकवण्याची शिवसेनेची (Shiv Sena) भुमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. भाजपच्या नेत्यांनीही तसे आरोप थेटपणे केले आहेत. नारायण राणे (Narayan Rane) यांच्यांसह त्यांची दोन्ही मुलं, नील सोमय्या, प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्याविरोधात कारवाईची पावले टाकल्यानंतर तर भाजप नेत्यांची जणू खात्रीच पटली. त्यातच गुरूवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी पांडे यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

मुंबई पोलिसांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांविरोधात आक्रमक धोरण अवलंबले असतानाच शिंदे व नार्वेकरांनी पांडे यांची भेट घेतल्याने चर्चेचा विषय झाला आहे. पांडे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांना ताबडतोब मातोश्रीवर बोलावले होते. त्यामुळं भाजप नेत्यांना अडचणीत आणण्यासाठीच पांडे यांची अत्यंत तातडीने नियुक्ती केल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे.

पांडे यांची आयुक्तपती नियुक्ती झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह आमदार नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सलियनविषयी केलेली वक्तव्ये त्यांना महागात पडली आहेत. त्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. मुंबै बँकेतील फसवणुकीचे हे प्रकरण आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या यांनी कारवाईच्या भीतीने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. भाजपचे आणखा काही नेते शिवसेनेच्या निशाण्यावर असल्याचे बोलले जात आहे.

या राजकीय घडामोडी घडत असतानाच बुधवारी एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर एकत्रितपणे पांडे यांच्या कार्यालयात भेटीसाठी गेले. त्याचे फोटो आता सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. या दोघांनी पांडे यांना काय सांगितलं असेल, याचीच चर्चा रंगली आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई केली जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पांडे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेकडून भाजपच्या नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याचे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com