तोच झब्बा परिधान करुन मी मृत्यूनंतर जाणार आहे; रावते झाले भावूक

विधान परिषदेतील (Legislative Council) १० सदस्य ७ जुलै २०२२ रोजी निवृत्त होत आहेत.
divakar ravate
divakar ravatesarkarnama

मुंबई : विधान परिषदेतील (Legislative Council) १० सदस्य ७ जुलै २०२२ रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे सभागृहात आज (ता. २३ मार्च) निरोप समारंभ पार पडला. त्यामध्ये शिवसेनेचे (shivsena) नेते दिवाकर रावते (Divakar Ravate) यांचा समावेश आहे. त्यांनी निवृत्त होताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी रावते म्हणाले, ''या राज्यातील दोन मुख्यमंत्र्यांच्या कामाची दखल जागतीक पातळीवर घेतली गेली. त्यामध्ये एक शरद पवार (Sharad Pawar) आणि दुसरे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आहेत. लातूरला भूकंप झाला. त्यावेळी शरद पवार यांनी घेतलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. त्यामुळेच त्यांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी दिली होती.

कोरोनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कामही मोठे आहे. प्रत्येक घरातला माणूस माझा आहे, असे म्हणत त्यांनी काम केले. कोरोनाचे संकट महाराष्ट्रात जास्त होते. कोरोना आला तेव्हा सगळ्यांचा एकच विषय होता. की मुंबईमध्ये धारावीचे काय होणार? मात्र, उद्धव ठाकरे यांनी 'धारावी पॅर्टन' राबला. त्याचे कौतुक जागतीक पातळीवर झाले. जगातल्या अनेक छोट्या देशांनी 'धारावी पॅर्टन' स्विकारला. कोरोना संकटामध्ये काम करताना उद्धव ठाकरे यांनी लढवय्या शिवसैनिक कसा असतो हे दाखवून दिले, असेही रावते म्हणाले.

divakar ravate
जयंत पाटील - सदाभाऊंच्या मैत्रीची चर्चा; अजितदादा म्हणाले "कोणी कायमचा शत्रू नसतो"

या संभागृहात संघर्ष खूप केला. तीन वेळा मला निलंबितही केले गेले, असेही रावते यांनी सांगितले. विधानसभेत हातवारे केले म्हणून मला निलंबीत केले होते. सभागृहात बसून बोलण्याचीही परवानगी नव्हती, अशा अनुभवही त्यांनी सांगितला.

मी मुंबईत काम करत असताना मला ग्रामीण भागात काम करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी पाठवले. कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे असे बाळासाहेंना वाटत होते. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असताना अनेक नेत्यांचे मार्गदर्शन घेतले. मी एकदा सभागृहात झब्बा घालून आलो होतो. माझी दिवाळी सगळी शेतकऱ्यांमध्ये जाते. रक्षा बंधनालाही मी मुंबईत कधीच नसतो, मी शेतकऱ्यांमध्ये असतो. आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेटले की त्यांना कुठेतरी तो आधार वाटतो. अशा अनेक भगिनींनी मला राख्या बांधल्या होत्या. त्याच राख्यांचा झब्बा मी घातला होता. तो झब्बा परिधान करुन मी सभागृहात आलो होतो. असा झब्बा परिधान करुन आल्यामुळे सभागृहात गोंधळ झाला होता. त्यानंतर मी सभापतींना सांगितले की हा झब्बा का घातला? तोच झब्बा मी जपून ठेवला आहे. मृत्यूनंतर मी त्यामध्येच जाणार आहे, असे भानवीक प्रसंगही यावेळी रावते यांनी सांगितले.

divakar ravate
24 तासांत निर्णय घ्या : चंद्रकांतदादांची सतेज पाटलांना ऑफर

सभागृहात समाजाचे जिवंतपण दिसले पाहिजे. येथे पक्ष नसतो, येथे मानवता आणि माणूसपण महत्त्वाचे असते. येथे जनतेचे प्रश्न मांडले पाहिजे. तो किती वाईट आहे हे सांगण्यापेक्षा आम्ही तुमच्यासाठी किती योग्य आहोत, हे मी सांगितले आहे. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचा अध्यक्ष होतो. त्यावेळी आमचे सरकार आले त्या सरकारमध्ये मला पक्षनेतृत्वाने मंत्री पदाची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आईवडिलांनी जन्म दिला आणि आपल्या पक्षाच्या नेतृत्वाने आपल्याला नाव लौकिक मिळवून दिला, असेही रावते यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला संधी दिली. ते स्वत: मुख्यमंत्री असताना या सभागृहात काम करण्याची संधी मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com