निधी मिळूनही तुम्ही का रडता ? ; खैरेंचा शिरसाटांना सवाल

शिरसाट यांच्या पत्राला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
निधी मिळूनही तुम्ही का रडता ? ; खैरेंचा शिरसाटांना सवाल
Chandrakant Khaire News, Sanjay Shirsat Newssarkarnama

औरंगाबाद : शिवसेनेत बंड झाल्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्व आमदारांना भावनिक आवाहन केलं होतं. पण उद्धव ठाकरे यांच्या या आवाहनाला शिवसेना (Shiv Sena) आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी सडेतोड उत्तर दिलं. त्यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राची गुरुवारी दिवसभर सोशल मीडियावर चर्चा झाली. (Chandrakant Khaire latest news)

"शिवसेना आमदारांना निधी मिळत नाही, आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे ना मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो?,” असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

शिरसाट यांच्या पत्राला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. "आमदार संजय शिरसाट आठवड्यातून 5 दिवस मुंबईत असतात. त्यांना हजारो कोटींचा निधी मिळाला तरीही ते म्हणतात आम्हाला निधी नाही.निधी मिळूनही तुम्ही का रडता ? का उद्धव साहेबांना सोडता ? रसद मिळाली म्हणून मागे लागतात का? मातोश्रीवर या, कुणी तुम्हाला रागावणार नाही, तुम्हला सन्मानपूर्वक पुन्हा साहेब घेतील," असे खैरे म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

Chandrakant Khaire News, Sanjay Shirsat News
मावळ्यांनो, परत या ! ; शिंदेंच्या तावडीतून सुटलेल्या आमदाराची विनंती

शिरसाट यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, साहेब, जेव्हा आम्हाला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता, तेव्हा खरे विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते. मतदरासंघातली काम करीत होते.निधी मिळाल्याची पत्र नाचवत होते. भुमीपुजन आणि उद्घाटनं करत होते. तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत होते. त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे ना मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो?,”

Chandrakant Khaire News, Sanjay Shirsat News
शिवसेनेचा बंडखोरांना इशारा : वेळीच सावध व्हा, नाहीतर सगळेच कायमचे 'माजी' होतील

“त्यांची काम कशी होतात? तुम्ही आम्हाला भेटतच नव्हता तर आम्ही मतदारांना उत्तर काय घ्यायचं या विचाराने जीव कासावीस व्हायचा,” अशी खंत संजय शिरसाट यांनी पत्रात व्यक्त केली आहे. संजय शिरसाट हे एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या बंडखोर आमदारांपैकी एक आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राची गुरुवारी दिवसभर सोशल मीडियावर चर्चा झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in