शिवसेनेच्या नादाला लागल्यास राखरांगोळी; भास्कर जाधवांनी ठणकावले

शिवसेनेच्या (Shiv Sena) नेतेपदी निवड झाल्यानंतर भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजपवर (BJP) टीका केली आहे.
Bhaskar Jadhav News
Bhaskar Jadhav News Sarkarnama

Bhaskar Jadhav : रत्नागिरी : शिवसेनेच्या (Shiv Sena) नेतेपदी निवड झाल्यानंतर भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजपवर (BJP) टीका केली आहे. ज्याच्या खांद्यावर मान ठेवली त्यांनी शिवसेनेचा केसाने गळा कापला. आधीच मित्रपक्ष वाढवले असते तर आज भाजपने केलेल्या विश्वासघाताच दुःख वाटले नसते, असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी भाजपवर केला.

जाधव रत्नागिरीमध्ये माध्यांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, संभाजी ब्रिगेडप्रमाणे महाराष्ट्रातील इतर पक्षांसोबत शिवसेनेने युती करायला करायला पाहिजे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला डिवचले होते. विनाशकाले विपरीत बुद्धी अशी खोचक टीका त्यांनी केली होती. फडणवीस यांच्या या टिकेला जाधव यांनी प्रयत्युत्तर दिले.

Bhaskar Jadhav News
शंभुराज देसाईंनी सांगितले शिंदे सरकारचे वास्तव; राज्याच्या तिजोरीत पैसेच नाहीत

आम्हाला विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणणाऱ्या फडणवीस यांच्या पक्षाने आजवर अनेकांशी युती केली आणि दगा दिला. शिवसेना मात्र, एकासोबतच कायम राहिली. त्यांच्या सारखे आम्ही मित्र पक्षांना दगा दिला नाही, असो टोला त्यांनी लगावला. दसरा मेळाव्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर जाधव म्हणाले, शिवसेनेने 56 दसरा मेळावे घेतले आहेत. त्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेला, एक चिन्ह एक झेंडा असलेला पक्ष म्हणजे शिवसेना.

शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी पक्ष आहे. कुणीही या निखाऱ्यात हात टाकण्याचा प्रयत्न करु नये, प्रयत्न करणाऱ्यांच्या राजकीय जीवनाची राख होईल, असा स्पष्ट इशारा जाधव यांनी दिला. शिवसेनेच्या नादाला लागू नका, असेही त्यांनी सांगितले. शिवसेना अंगार आहे, आगीशी कोणी खेळणार असेल तर खेळणाऱ्याची राजकीय कारकीर्द जळून खाक होईल, असेही त्यांनी ठणकावले.

भाजपने शिवसेना आणि संभाजी बिग्रेड युतीचा धसका घेतला आहे. २५ वर्ष शिवसेनेने एकाच पक्षाच्या खाद्यावर विश्वासाने मान ठेवली होती. मात्र, केसाने गळा कापण्याचे काम केले. दरम्यान, शिवसेनेच्या वतीने भास्कर जाधव यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. जाधव यांची नेतेपदी निवड होताच अनेक कार्याकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटत घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com