'एकनाथ शिंदेंना पायउतार व्हावे लागेल; राज्यात राष्ट्रपती राजवट येणार!'

माजी मंत्री आणि शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते अनंत गिते (Anant Gite) यांनी मोठे भाकीत केले आहे.
Anant Gite
Anant Gitesarkarnama

रत्नागिरी : माजी मंत्री आणि शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते अनंत गिते (Anant Gite) यांनी मोठे भाकीत केले आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत गीते यांच्या वक्तव्याला महत्त्व आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पायउतार व्हावे लागेल. त्यानंतर महाराष्ट्रात त्यांचे सरकार येणार नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल आणि कदाचित गुजरातबरोबरच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होतील, असे माझे भाकीत असल्याचे गिते म्हणाले.

रत्नागिरीतील एका कार्यक्रमात गीते बोलत होते. या वेळी बोलताना त्यांनी माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर देखील टीका केली. अनेक लखोबा लोखंडे आहेत, त्यापैकी एक रत्नागिरीत आहे'' असे गितेंनी नाव न घेता सामंतांवर निशाणा साधला. पुढे गिते म्हणाले ''घराघरांत कलह आहेत, वाद आहेत. आपली आईच संकटात असेल तर आपण कलह करत बसणार नाही, तर आईला वाचवणार. शिवसेना आज संकटात आहे, ही आपली आई संकटात आहे, असेही ते म्हणाले. आपल्याला आईला वाचवायचे आहे. आम्हाला राजकीय जन्म देणारी शिवसेना माता आहे, ही आईच आज संकटात आहे, तिला आपल्याला वाचवायचे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

Anant Gite
त्यावेळी खासदार श्रीकांत शिंदे मला सातत्याने फोन करायचे...बारणेंनी केलं गुपित उघड...

आपण उद्धवजींच्या अश्रूंचा आपण महापूर केला पाहिजे, त्यामध्ये या गद्दारांना गाडून टाका'' असेही गिते म्हणाले. एकनाथ शिदेंसह ४० आमदारांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. दरम्यान, छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी जे बंड केले ते बंड स्वबळावर केले होते. शिंदे यांचे बंड भाजप (BJP) पुरस्कृत आहे, अशी टीकाही गीते यांनी रत्नागिरीत केली. एवढेच नाही तर शिवसेनेने यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

Anant Gite
गद्दार म्हणू नका म्हणता; पण तुम्ही तर कपाळावरच शिक्का मारुन घेतला; ठाकरेंनी डिवचले

छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी स्वबळावर बंड केले होते. राणेंच्या बंडाला काँग्रेसने सहकार्य जरुर केले. मात्र, त्या बंडाची पुरस्कर्ती काँग्रेस नव्हती. त्या बंडाचे कारस्थान काँग्रेसने रचलेले नव्हते. सध्याचे बंड हे भाजप पुरस्कृत, भाजप रचित असल्याचेही गीते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in