सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले, असे फडणविसांनी म्हणताच आदित्य यांचे प्रत्युत्तर!

आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले, असे फडणविसांनी म्हणताच आदित्य यांचे प्रत्युत्तर!
Aditya Thackeray, Devendra Fadnavissarkarnama

मुंबई : "सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली 'मर्सिडीज बेबी' आहे, त्यांना ना संघर्ष करावा लागला ना पाहावा लागला, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना लगावला होता. त्यावर आता आदित्य ठाकरे यांनी फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

आदित्य ठाकरे मुंबईत बोलत होते. यावेळी ते म्हणाले, मी असा कोणताही दावा केलेला नाही कि मी 'मर्सिडीज गाडी'चा शोध लावला किंवा मर्सिडीज गाडी बनवली. थोडा इतिहासाचा अभ्यास केला तर कुठेही इंग्रजांनी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला नव्हता. मग ते मागील जन्मात कुठल्या बाजूने होते ते शोधावे लागेल. लोकांमध्ये एक भावना आहे कि राजकीय पक्ष इतिहासावरुन भांडत आहेत. मात्र, जे गंभीर प्रश्न आहेत. जसे कि रोजगार, दंगल किंवा केंद्राकडून टाकल्या जाणाऱ्या धाडी यावर कोणी बोलत नाही. आपण देश म्हणून पुढे जायचे असेल तर यावर चर्चा करावी लागणार आहे, असे आदित्य म्हणाले.

कुठेतरी अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. विचलित करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोपही त्यांनी भाजपवर केली. दंगली करण्याच्या प्रयत्नामुळे देशाचे नाव जगात खराब होते. सरकारवर टीका करायची असेल तर करावी. मात्र, किती भांडणे लावली पाहिजेत यावर लक्ष्मण रेषा आली पाहिजे. मागच्या जन्मात कोण कुठल्या बाजूने होते ते ठीक आहे. पण आता आपण भांडणे लावण्याच्या बाजूने आहात का, असा सवाल आदित्य यांनी फडणवीस यांना केला. आता आपण विकासाच्या बाजूने असले पाहिजे. नागरिक विचार करत असतील कि आम्ही यांना मते देतो. यांनी इतिहासावरून भांडण्यापेक्षा विकासावर लक्ष दिले पाहिजे. आता देशात रोजगार देणारे किंवा जीएसटी देणारे महाराष्ट्र प्रथम राज्य आहे.

यावेळी आदित्य यांनी मनसेनेच्या भोंगे आंदोलनाबाबत विचारले असात, ते म्हणाले, लोकांना यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. लोकांचा विश्वास महाविकास आघाडीवर आहे. भोंग्यापेक्षा सध्या राजकारणाचा आवाज जास्त मोठा आहे. हे राजकारण समाजकारणसाठी वापरले तर चांगले होईल. बाहेरील देशातील आपले भारतीय म्हणत असतील कि देश कुठे चालला आहे. मला वाटत कि राजकीय हेतूने जे होते त्याला कसे टाळायचे हे लोकांना माहित आहे. आज सर्व सुरु आहे. लोक आपापल्या कामाला गेले आहेत. अर्थचक्र सुरु आहे. आम्ही राजकीय मंडळी म्हणून आणि खास करून इथला विरोधी पक्ष म्हणून हे करत आहेत हे लोकांना नाहीत आहे.

Aditya Thackeray, Devendra Fadnavis
'ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडणे लावून फडणवीसांनी जाणीवपूर्वक आरक्षण मिळू दिले नाही!'

बाळासाहेब ठाकरे यांचे ऐकणार कि शरद पवार यांचे ऐकणार असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर आदित्य यांना विचारले असता ते म्हणाले, आपल्या सर्वाना माहित आहे कि मुख्यमंत्री लोकांसाठी काम करत आहेत. लोकांचे ऐकत आहेत. महाराष्ट्र कसा पुढे जाईल यासाठी काम करत आहेत. हे करण्यापेक्षा स्वतःचे वेगवेगळे व्हिडीओ दहा वर्षांपासून चे पाहावे. बाळासाहेब म्हणाले होते कि राजकारणा पेक्षा समाजकारण करावे, आणि आम्ही तेच करतोय असे आदित्य यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणाच्या निकालावर आदित्य म्हणाले, मी न्यायालयाचा निकाला वाचला नाही. त्यावर आता बोलणे योग्य नाही. निवडणुकीसाठी नेहमीच तयार असतो. आम्ही काय करुन दाखवले ते लोकांना माहित आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.