शिवसेनेने अनेक आव्हानं पायदळी तुडवली आहेत; ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा

Uddhav Thackeray| Supreme Court| राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama

मुंबई : महाराष्ट्रातून शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण त्यांना कल्पना नाही की शिवसेनेने अशी अनेक आव्हानं पायदळी तुडवून भगवा रोवला आहे," असा विश्वास शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केला. न्यायालयात सुणावणी सुरु असताना उद्धव ठाकरेंनी 'मातोश्री' (Matoshree) निवासस्थानाबाहेर जमलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी शिवसेना संपण्याच्या मार्गावर असल्याच्या विधानाकडे लक्ष वेधलं. "शिवसेना संपतेय आता केवळ भाजपच राहणार," असं जेपी नड्डा म्हणाले होते. “आजपर्यंत अनेकदा शिवसेनेला फोडण्याचे प्रयत्न झाले पण आता शिवसेना संपवण्याचे प्रयत्न आहे हे मी पहिल्यांदाच बोललो होतो आणि ते नड्डा यांनी बोलून दाखवले. खरंतर शिवसेनेत यापुर्वीही बंड झाले अशी बंड थंड करण्याची ताकदही माझ्याकडे आहे. पण आता राजकारणात तुम्हाला मुळापासून संपवण्याचा कट रचला जात आहे, असा गंभीर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांना कोणता कानमंत्र दिला?

“दोन ते तीन पातळ्यांवर आपली लढाई सुरु आहे. रस्त्यावरील लढाईत आपण कधीही कमी पडणार नाही. न्यायालयातही सुनावणी सुरु आहे आणि तिसरी लढाई म्हणजे शपथपत्र आणि सदस्य नोंदणी आहे. हा विषय गंभीर असल्याने तो अर्ध्यात सोडू नका,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं. माझा न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या त्रिसदस्यीय पीठापुढे सुनावणी पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी बंडखोरांकडे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचा मुद्दा मांडला. तर शिंदे गटाने वारंवार आपण अद्यापही शिवसेनेच असून पक्षाचं सदस्यत्व सोडलं नसल्याचा दावा केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in