शिवसेनेची परंपरा खंडीत होणार? दसरा मेळाव्यावरुन राजकारण तापले

शिवसेनेला (Shivsena) दसरा मेळाव्यासाठी अजून परवानगी मिळाली नाही
Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेतील (Shivsena) संघर्ष टोला गेला आहे. शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड करुन ठाकरे सरकार पाडले. त्यानंतर शिवसेनेवर दावा सांगितला. त्याचा वाद निवडणूक आयोगापर्यंत गेला आहे. त्यातच आता शिवसेनेची अनेक वर्षांची परंपरा असलेल्या शिवाजी पार्क मैदानावरील दसरा मेळाव्यावरुन राजकारण तापले आहे.

शिवसेनेची अनेक वर्षांची परंपरा खंडीत करुन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर दसरा मेळाव्यावरुनही कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून सुरु आहे. शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. मात्र, दसरा मेळाव्यासाठी ठाकरे यांना अजूनही परवानगी मिळालेली नाही. त्यातच शिंदे गटाकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेऊन आम्हीच खरी शिवसेना असल्याचे दाखून देण्याची शक्याता व्यक्त केली जात आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
...तर शरद पवारांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करा : माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस नेतृत्वाला सल्ला

एकनाथ शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. पावसाळी अधिवेशनात शिंदे गटाच्या आमदारांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेनेने दसरा मेळाव्याबाबत मुंबई महापालिकेला शिवाजी पार्कच्या मैदानासाठी अर्ज केला आहे. शिवसेनेने अर्ज केल्यानंतर महापालिकेने हात आखडते घेतले आहेत.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
साई मंदिरातील फूल-हार विक्रीबाबतचे धोरण ठरविण्यासाठी मंत्री विखेंनी केली समिती गठीत

त्यामुळे दसरा मेळावा होणार की नाही? झाला तर तो कोण घेणार असे एक ना अनेक प्रश्न शिवसैनिकांच्या मनात आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे दसरा मेळ्यावरुन राजकीय कुरघोडी सुरु झाली आहे. महापालिकेच्या निवडणुकीमुळे दसरा मेळाव्याला महत्व प्राप्त झाले आहे. मात्र, शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुखांच्या उपस्थितीत मेळावा होतो. या मेळाव्यातून अनेकदा शिवसेनेची भूमिकाही स्पष्ट होत असते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in