दसरा मेळावा : शिवसेनेला न्यायालयाने सात वेळा परवानगी दिली; उद्या काय होणार?

महानगरपालिकेने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेला (Shivsena) परवानगी नाकारली आहे
shiv sena
shiv senasarkarnama

मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्याचा वाद आता मुंबई उच्च न्यायालायत (High Court) गेला आहे. शिवसेनेने केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. यावर शिवसेना नेते अॅड. अनिल परब (Anil Parab) यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. शिवतीर्थावर मेळावा घेण्यास आम्हाला आडकाठी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्हाला न्यायालयाकडून परवानगी मिळेल, असेही परब यांनी सांगितले.

या पूर्वीही शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यासाठी उच्च न्यायालयाने सात वेळा परवानगी दिली आहे. त्यामुळे याही वेळेला आम्हाला परवानगी मिळेल, असे परब यांनी सांगितले. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. शिवसेनेने पर्यायी जागा पाहिली नसल्याचेही परब यांनी सांगितले. दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

shiv sena
दसरा मेळाव्याचे काय होणार? अनिल परबांनी स्पष्टच सांगितले

उद्या उच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. सध्या सुरू असलेला प्रकार हा दसरा मेळाव्याला अपशकून करण्याची वृत्ती आहे. 1966 पासून दसरा मेळावा होत आहे. यामध्ये आडकाठी केली जात आहे. दसरा मेळाव्यासाठी विविध प्रकरणात न्यायालयात सात वेळा आम्हाला परवानगी मिळाली आहे. न्यायालयात उद्या युक्तिवाद होईल. आम्ही दसरा मेळाव्या संदर्भातील सर्व कागदपत्रे वकिलांकडे दिली आहेत. त्यामुळे आम्हाला मेळाव्यासाठी परवानगी मिळेल, असे परब म्हणाले.

shiv sena
शिंदे सरकारचा 'तो' निर्णय अन् अदानींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई महापालिकेने कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचे सांगत शिवसेना, शिंदे गटाला परवानगी नाकारली. त्यावरही परब यांनी टीका केली. संघर्षाच्या ठिणग्या फक्त दादरमध्ये झडतात का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वांद्रे-कुर्ला संकुलात त्यांचा मेळावा आहे. मग, त्याच वांद्रेत 'मातोश्री'देखील आहे, असे सांगत परब यांनी महापालिकेच्या निर्णयावर टिका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com