Vidhan Parishd Elelction
Vidhan Parishd Elelction

सुभाष देसाईंना धक्का: शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना संधी

Shivsena| Vidhan Parishd Elelction|विधानपरिषदेवर १० आमदार निवडून देण्यासाठी येत्या २० जून रोजी मतदान होणार आहे.

Vidhan Parishad Election 2022

मुंबई : राज्यसभा निवडणूकांच्या घडामोडींना वेग आला असताना शिवसेनेच्या गोटातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शिवसेनेकडून (Shivsena) विधानपरिषदेसाठी सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Elelction) आहे. एकूण १० आमदार निवडून देण्यासाठी येत्या २० जून रोजी मतदान होणार आहे. त्या दृष्टीने शिवसेनेने आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.

कोण आहेत सचिन अहिर ?

ऐन विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर 5 जुलै 2019 रोजी राष्ट्रवादीला धक्का देत सचिन अहिरांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मातोश्री’वर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वरळी मतदारसंघात सचिन अहिर यांचा मोठा दबदबा आहे. विधानसभा निवडणूकीत आदित्य ठाकरेंना जिंकून देण्यात अहिर यांचा मोलाचा वाटा मानला जातो. सेनाप्रवेशापूर्वी अहिर यांचा राष्ट्रवादीत मोठा दबदबा होता.

 Vidhan Parishd Elelction
महसूलच्या प्रत्येक बदलीत एक-दीड कोटींची वसुली!

सचिन अहिर 1999 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. सचिन अहिर यांचे मामा अरुण गवळी यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून त्यांना निवडून आणलं. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात 2009 मध्ये सचिन अहिर गृहनिर्माण राज्यमंत्रीपदी विराजमान झाले.

कोण आहेत आमशा पाडवी ?

शिवसेनेने विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिलेले दुसरे उमेदवार आहेत आमशा पाडवी. आमशा पाडवी यांना कट्टर शिवसैनिक म्हणूनही ओळखले जाते. 2019 मध्ये धडगाव-अक्कलकुवा मतदारसंघातून पाडवी यांनी विधानसभा निवडणूक लढवली. पण काँग्रेस नेते के.सी पाडवी यांच्याकडून पराभव झाला. आज त्यांना शिवसेनेने विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे. सचिन अहिर 1999 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com