पुढच्या ‘संविधान दिनी’ पंतप्रधान भाषण कुठे करणार?

पंतप्रधान मोदी यांना अजूनही काँगेसचे भय
PM Narendra Modi
PM Narendra Modi

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संविधान दिनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाषण दिले. याच हॉलमध्ये स्वातंत्र्याशी नियतीचा करार झाला. मोदी आता नवी संसद निर्माण करीत आहेत. या संसदेत ‘सेंट्रल हॉल’च नाही. त्यामुळे पुढच्या ‘संविधान दिनी’ पंतप्रधान भाषण करणार कुठे? असा सवाल करत शिवसेनेने (Shivsena) पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी नव्या संसदेची इमारत निर्माण केली. पण या इमारतीत सेंट्रल हॉलच नाही, याकडे लक्ष वेधत दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने पुन्हा एकदा पंतप्रधानांवर टीका केली आहे.

PM Narendra Modi
आमदार संग्राम जगतापांना न्यायालयाची नोटीस

संविधान दिनानिमित्त संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये संविधान दिवस (Constitution Day) साजरा करण्यात आला. पण या संपुर्ण कार्यक्रमावर काँग्रेससह (Congress) बहुतेक सर्वच विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी ‘पार्टी फॉर द फॅमिली, पार्टी बाय द फॅमिली’ हे लोकशाहीला घातक असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे कॉंग्रेसवर टीका केली. परंतू कॉंग्रेससह सर्व विरोधीपक्षाने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याने पंतप्रधान मोदी हे फक्त स्वपक्षाच्या खासदारांसमोरच बोलले. संविधान दिनाचे महत्त्व लक्षात घेतले तर राजकीय विरोधकांवर टीका हाच एकमेव कार्यक्रम कसा ठरू शकतो? असा खोचक टोलाही शिवसेनेने अग्रलेखातून लगावला आहे.

''गेल्या दहा वर्षांत काँगेस राजकीयदृष्ट्या दुर्बल झाली आहे. अशा दुर्बल झालेल्यांवर वारंवार आपले पंतप्रधान टीका करतात. याचा सरळ अर्थ असा की, पंतप्रधान मोदी यांना अजूनही काँगेसचे भय वाटते व भाजपला राष्ट्रीय स्तरावर पर्याय हा काँग्रेसच असू शकतो, अशी टीकाही शिवसेनेने केली आहे.

याचबरोबर, शिवसेनेने पंतप्रधानाना हुकूमशाहीच्या मुद्द्यावरुनही डिवचले आहे. काँग्रेस हा लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. काँग्रेसच्या विचारधारेशी मतभेद असू शकतात; पण काँगेसने आजच्याप्रमाणे लोकशाहीचे स्तंभ मोडून बाजारात विकायला काढले नव्हते, असे म्हणत शिवसेनेने नरेंद्र मोदी यांना डिवचले आहे.

याशिवाय भाजप ही ‘फॅमिली पार्टी’ नाही, पण गेल्या काही वर्षांपासून तेथे एकाच गटाची हुकूमशाही आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यावर त्यांनी गुजरातच्याच नेत्याला पक्षाचे अध्यक्ष केले. सत्ता व पक्षाची सूत्रे आपल्याच हाती राहावीत यासाठीच ही व्यवस्था होती. काँग्रेसची सूत्रे गांधी घराण्याकडे असणे व भाजपची सूत्रे पंतप्रधानांच्या मुठीतल्या व्यक्तीकडे असणे हे सारखेच आहे, असे म्हणत शिवसेनेने पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र डागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com