फडणवीस हेसुद्धा तितकेच अपराधी ; हाच खेळ त्यांच्यावर उलटू शकतो !

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी पकडून नवाब मलिक यांच्याशी वैयक्तिक वैर पुढे नेले आहे
sanjay raut, devendra fadnavis
sanjay raut, devendra fadnavissarkarnama

मुंबई : शिवसेनेचे (shiv sena) मुखपत्र असलेल्या 'सामना'तून आज माजी मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यावर (nawab malik) टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. (devendra fadnavis latest news)

"देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्याशी वैयक्तिक वैर घेतले आहे व केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी पकडून ते वैयक्तिक वैर पुढे नेत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांतील अधिकाऱयांना ‘फतवे’ देण्याचे काम फडणवीस करतात, ही त्यांना आज मजा वाटत आहे, पण हाच खेळ भविष्यात त्यांच्यावर उलटू शकतो," असा इशारा फडणवीसांना देण्यात आला आहे.

sanjay raut, devendra fadnavis
औरंगजेबाच्या कबरीवर ओवेसीं डोकं टेकवतात, तेव्हा राष्ट्रवादी निषेध का नोंदवत नाही ?

"फडणवीस हे पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते व गृहखाते त्यांच्याच ताब्यात होते. नवाब मलिक (nawab malik) यांचे ‘डी’ गँगशी संबंध होते हे त्यांना तेव्हा का दिसले नाही व ‘डी’ गँगची पाळेमुळे फडणवीस यांनी तेव्हाच का खणून काढली नाहीत? मलिक यांचे दाऊद वगैरेंशी संबंध होते तर फडणवीस यांनी ते रॅकेट उद्ध्वस्त करायला हवे होते. त्यामुळे फडणवीस हेसुद्धा तितकेच अपराधी आहेत," असे अग्रलेखात म्हटलं आहे.

sanjay raut, devendra fadnavis
राजीव गांधी हत्येतील आरोपीची मुख्यमंत्र्यांनी घेतली गळाभेट ; गांधी परिवाराचे मौन

'सामना' अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:

  • नवाब मलिक यांच्यावरील कारवाई ही वैयक्तिक सूडातूनच करण्यात आली. मलिक यांनी अशा काही प्रकरणांना हात घातला की, त्यामुळे भाजपची वाट बिकट झाली होती म्हणून त्यांच्यावर केंद्रीय तापस यंत्रणांनी कारवाई केली.

  • शरद पवार हे देशाचे संरक्षणमंत्री असताना त्यांच्यावर गोपीनाथ मुंडे वगैरे लोकांनी दाऊदसंदर्भातले आरोप करून खळबळ उडवली, पण नंतर गृहखाते मुंडेकडे येऊनही या आरोपांची चौकशी झाली नाही व तथ्यही समोर आणले गेले नाही.

  • दाऊद ही कथा किंवा दंतकथा आज उरलेली नाही, पण भाजप व केंद्रीय तपास यंत्रणा दाऊदच्या नावाने उद्योग करून दाऊदची विरासत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात. यात त्यांचा स्वार्थ आहे.

  • फडणवीस यांच्या विरोधात नवाब मलिक यांनी हल्लाबोल करताच केंद्रीय तपास यंत्रणांचा पद्धतशीर वापर करण्यात आला व त्यास ‘डी’ गँगचा संदर्भ दिला. दाऊद नक्की कुठे आहे हे आता रहस्यच आहे. दाऊद देशासाठी इतका खतरनाक आहे व त्याचे अंडरवर्ल्डचे जाळे असे पसरले असेल तर केंद्र सरकारचे गृहखाते काय करतेय?

  • देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी पकडून नवाब मलिक यांच्याशी वैयक्तिक वैर पुढे नेले आहे

  • नवाब मलिक व कथित ‘डी’ गँगचे संबंध दाखविण्यात आले ते काही आजचे नाहीत. मग तेव्हा हे लोक काय झोपले होते?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com